K. Viswanath | दिग्दर्शक के विश्वनाथ यांच्या पत्नी जयलक्ष्मी यांचे देखील निधन; वयाच्या 88 व्या वर्षी घेतला अखेरचा श्वास

पोलीसनामा ऑनलाइन : K. Viswanath | 2 फेब्रुवारी रोजी तेलगू चित्रपट सृष्टीतील महान दिग्दर्शक म्हणून ओळखले जाणारे कासिनाथनि विश्वनाथ म्हणजेच के विश्वनाथ (K. Viswanath) यांचे निधन झाले होते. आता जवळपास एका महिन्यांनी त्यांच्या पत्नी जयलक्ष्मी यांनीही जगाचा निरोप घेतला आहे. वयाच्या 88 व्या वर्षी त्यांनी अखेरचा श्वास घेतला. वृद्धपकाळाने त्यांचे निधन झाले आहे. (K. Viswanath)

गेल्या वर्षभरापासून के विश्वनाथ यांच्या पत्नी जयलक्ष्मी या आजारी होत्या. काही दिवसांपूर्वी त्यांची प्रकृती खालावल्याने त्यांना रुग्णालयात दाखल करण्यात आले होते. तेथेच त्यांची प्राणज्योत मालवली. सध्या सोशल मीडियावर अभिनेता पवन कल्याण आणि चिरंजीवी हे जयलक्ष्मी यांना भेटायला गेल्याचा फोटो वायरल होताना दिसत आहे. जयलक्ष्मी यांच्या निधनामुळे त्यांच्या कुटुंबावर शोककळा पसरली आहे. त्यांच्या निधनानंतर अनेक कलाकारांनी पोस्ट शेअर करत शोक व्यक्त केला आहे.

जयलक्ष्मी यांचे पती महान तेलुगु दिग्दर्शक के विश्वनाथ (K. Viswanath) हे वयोमानाशी संबंधित
आजारामुळे हैदराबाद मधील रुग्णालयात उपचार घेत होते. यादरम्यानच 2 फेब्रुवारी रोजी त्यांचे निधन झाले.
2017 मध्ये त्यांना दादासाहेब फाळके पुरस्काराने सन्मानित करण्यात आले होते.
ते तेलगू दिग्दर्शक असले तरी त्यांनी हिंदी चित्रपटसृष्टीतही मोलाचे काम केले आहे.
तेलुगु दिग्दर्शक के विश्वनाथ यांच्या पत्नी जयलक्ष्मी या कर्नुल जिल्ह्यातील रहिवासी होत्या.
त्यांचे वडील हे स्टेशन मास्तर म्हणून काम करत होते. त्यांच्या पश्चात दोन मुलं एक मुलगी आणि सहा नातवंड असा परिवार आहे.

Web Title :-  K. Viswanath | k viswanath wife jayalakshmi passed away on february 26 at her hyderabad residence

Join our WhatsApp GroupTelegramfacebook page and Twitter for every update

हे देखील वाचा

Pune Crime News | शासकीय अधिकारी तरुणीवर ओळखीतून केला अत्याचार; अश्लिल व्हिडिओ व्हायरल करण्याची धमकी देऊन उकळले १६ लाख ८६ हजार

Maharashtra Budget Session 2023 | गळ्यात कांद्याची माळ, डोक्यावर टोपली; विधिमंडळाबाहेर विरोधकांची जोरदार घोषणाबाजी (व्हिडिओ)

Sachin Tendulkar | वानखेडे स्टेडियममध्ये सचिन तेंडुलकर यांचा उभारणार पुतळा; मुंबई क्रिकेट असोसिएशनचा मोठा निर्णय