Photos : ‘किंग’ शाहरुखच्या मेहुणीत १८ वर्षात झाला ‘इतका’ बदल ; आता दिसते एकदम ‘कडक’ !

मुंबई : पोलीसनामा ऑनलाईन – कभी खुशी कभी गम या सिनेमात करीना कपूर खानचा पू म्हणून असलेला रोल लोकांना खूप आवडला होता. पू चे नखरे आणि अदांनी चाहत्यांना चांगलेच इम्प्रेस केले होते. या सिनेमात करीना कपूरचा रोल जितका गाजला तितकाच तिच्या लहानपणीचा रोलही लोकांना खूप आवडला होता. या सिनेमाला रिलीज होऊन १८ वर्षे झाली आहेत. या सिनेमातील सर्व स्टारकास्ट बदलून गेली आहे. यातील करीनाच्या लहानपणीची भूमिका साकारणारी अ‍ॅक्ट्रेसही या १८ वर्षात खूप बदलली आहे.

मालविका राज नावाच्या बाल कलाकराने त्यावेळी करीना कपूरच्या लहानपणीचा रोल साकारला होता. चांदनी चौकात राहणाऱ्या अल्लड मुलीचा मालविकाने साकारलेला रोल सर्वांच्या मनात बसला. मालविकाने याच सिनेमातून डेब्यू केला आहे हे क्वचितच कोणाला माहिती असेल.

या सिनेमानंतर मात्र मालविका मोठ्या पडद्यापासून दूरच दिसत आहे. मालविकाचे इंडस्ट्रीसोबत आधीपासूनच नाते आहे. मालविका प्रसिद्ध अभिनेता जगदीश राज यांची नात आहे आणि स्क्रिन रायटर बॉबी राज यांची मुलगी आहे. मालविका लवकरच सिनेमात पुन्हा एकदा दिसणार आहे. बॉलिवूडचा प्रसिद्ध विलेन डॅनी यांचा मुलगा रिनजिंगसोबत मालविका स्कॉईड सिनेमात दिसणार आहे. या सिनेमात ती लिड रोलमध्ये असणार आहे.

View this post on Instagram

Luster Dust ✨✨ #weddingasia @weddingasiaofficial #malvikaraaj Photography: @varunchauhan Jewellers:@diamond_constellation Couture: @madameexclusive MUA: @13kavitadas Hair: @aliyashaik28 Stylist: @ambertikari brides #bridesofindia #bride #weddingshopping #weddingdiaries #weddings #weddingphotography #bff #bestfriendgoals #shopping #exhibition #indianphotography #indianbrides #indianweddings #fashion #style #fashionblogger #style #newdelhi #delhiblogger #delhidiaries #gurgaon #noida #bridesofindia #bridetribe #bridetobe #bridesmaid #bridegoals #mybridesmaid #bridetobe #malvikaraaj #brides2019 @weddingplz @wedmegood @wedabout @weddingsutra @shaadimagic @wedwise @weddingvows.in @weddingduoindia @weddingnet @shaadimagic @popxo.wedding @shaadisaga @shaadiwish @shaadisquad @popxodaily @viniyardfilms

A post shared by Malvika Raaj (@malvikaraaj) on

मालविकाला सिनेमांशिवाय मॉडेलिंगचीही आवड आहे. मालविकाने मिस इंडिया पेजेंटमध्येही भाग घेतला आहे. ती सोशलवर नेहमीच सक्रिय असते. आपले अनेक नवीन फोटो ती चाहत्यांसाठी शेअर करत असते. १८ वर्षांच्या या मोठ्या कालावधीत मालविकाच्या लुकमध्ये खूपच बदल झाला आहे. काही फोटोंमध्ये तर ती ओळखूही येत नाही.

कभी खुशी कभी गम हा सिनेमा २००१ साली रिलीज झाला होता. या सिनेमात मालविका व्यतिरीक्त अमिताभ बच्चन, जया बच्चन, शाहरुख खान, काजोल, करीना कपूर आणि ऋतिक रोशन मुख्य भूमिकेत होते. या सिनेमाने बॉक्स ऑफिसवर जबरदस्त कमाई केली होती. हा सिनेमा त्या काळातील ब्लॉकबस्टर सिनेमांपैकी एक आहे.

 

आरोग्यविषयक वृत्त

 

Loading...
You might also like