Birthday SPL : ‘जेम्स बॉन्ड’ सीरिजमध्ये दिसणारे ‘हे’ एकमेव भारतीय अभिनेते ! 29 वर्षांनी लहान महिलेसोबत केलं लग्न

पोलीसनामा ऑनलाइन टीम  –  बॉलिवूड अ‍ॅक्टर कबीर बेदी (Kabir Bedi) हे रिस्पेक्टेड अ‍ॅक्टर्सपैकी एक आहेत. त्यांनी इंटरनॅशनल सिनेमातही काम केलं आहे. बॉलिवूडमध्ये भलेही कमी सिनेमात त्यांनी लिड रोल साकारला आहे, परंतु त्यांनी जेवढेही रोल केले आहेत सगळेच दमदार आहेत. त्यांच्या तगड्या पर्सनॅलिटीमुळं त्यांना अनेक सिनेमात निगेटीव्ह रोल मिळाले आहेत. आज ते त्यांचा वाढदिवस साजरा करत आहेत. त्यांचा जन्म 16 जानेवारी 1946 रोजी लाहोरमध्ये झाला होता. आज आपण त्यांच्या बद्दल काही खास माहिती जाणून घेणार आहोत. त्यांच्या अनेक चाहत्यांची याबद्दल माहिती असेलही.

कबीर बेदी यांनी केले 4 लग्न

कबीर बेदी यांच्या खासगी आयुष्याबद्दल बोलायचं झालं तर त्यांनी 1969 साली प्रोतिमा गैरीसोबत पहिलं लग्न केलं होतं. दुसरं लग्न त्यांनी सुजान हम्फ्रीज सोबत केलं. निक्की बेदी सोबत त्यांनी तिसरं लग्न केलं आणि 2005 साली त्यांचा घटस्फोट झाला. 2016 मध्ये त्यांनी परवीन दुसांझ सोबत चौथं लग्न केलं. ती त्यांच्यापेक्षा 29 वर्षांनी लहान आहे. दोघांची खास बॉंडिंग कोणापासूनच लपली नाहीये. आपल्या 70 व्या वाढदिवसाच्या एक दिवस आधी कबीर यांनी परवीन सोबत लग्न केलं. हे लग्न त्यावेळी खूप चर्चेत राहिलं होतं. सध्या ते मुंबईत राहतात. परंतु सिनेमात जास्त काम करताना दिसत नाहीत. तसं तर त्यांनी अनेक सिनेमात भूमिका साकारल्या आहेत.

हॉलिवूडमध्येही दिसला कबीर बेदीचा अंदाज

कबीर यांच्या वर्कफ्रंटबद्दल बोलायचं झालं तर कबीर बेदींनी 1971 मध्ये आलेल्या हलचल सिनेमातून करिअरला सुरुवात केली होती. त्यांनी यानंतर कच्चे धागे, मंजिले और भी हैं, नागिन, बुलेट और अनाडी असे अनेक सिनेमे केले. 1983 साली त्यांनी अशा एका सिनेमात काम केलं जे भल्या भल्या अ‍ॅक्टर्सचं स्वप्न असतं. कबीर बेदी जेम्स बॉन्ड सीरिजचा 13 वा सिनेमा ऑक्टोपसी (Octopussy) मध्ये दिसले होते. यात त्यांनी एका शीख व्यक्तीची भूमिका साकारली होती. इतकंच नाही तर त्यांनी इटालियन आणि इतर भाषेतील आणि इतर देशांच्या सिनेमात काम केलं आहे. परदेशी भाषेतील अनेक टीव्ही सीरिजमध्येही त्यांनी काम केलं आहे. गेल्या काही कालावधीबद्दल बोलायचं झालं तर सध्या ते सिनेमापासून काहीसे दूरच आहेत. त्यांनी मोहेंजोदडो, पैसा वसूल आणि साहेब बीवी और गॅंगस्टर 3 अशा अनेक सिनेमात काम केलं आहे.