‘कबीर सिंह’चा बॉक्स ऑफिसवर ‘बोलबाला’ ; पहिल्या दिवशीच केली ‘इतक्या’ कोटींची कमाई

मुंबई : पोलीसनामा ऑनलाईन – दोन वर्षांपू्र्वी अर्जुन रेड्डी या सिनेमाने अभिनेता विजय देवराकोंडाला रातोरात तेलगु इंडस्ट्रीचा स्टार बनवलं होतं. आता दोन वर्षांनंतर बॉलिवूड स्टार शाहिद कपूरने विजयच्या पाऊलावर पाऊल टाकत अर्जुन रेड्डीच्या हिंदी रिमेकमध्ये काम केले आहे. शाहिदच्या या सिनेमाला प्रेक्षकांचं भरभरून प्रेम मिळताना दिसत आहे. पहिल्याच दिवशी या सिनेमाने बॉक्स ऑफिसवर दमदार कमाई केली आहे.

शाहिद कपूर आणि कियारा आडवाणी स्टारर कबीर सिंह सिनेमाने शानदार ओपनिंग केली आहे. कबीर सिंहने पहिल्याच दिवशी 20.21 कोटींची कमाई केली आहे. यानंतर हा सिनेमा शाहिद कपूरचा सर्वात मोठा ओपनर सिनेमा बनला आहे. कबीर सिंहने 19 कोटींची कमाई करणाऱ्या पद्मावत आणि 16.50 कोटींची कमाई करणाऱ्या टोटल धमाल सिनेमाला मागे टाकलं आहे. हा सिनेमा या वर्षातील सर्वात मोठा नॉन हॉलिडे ओपनर सिनेमाही बनला आहे. हा सिनेमा भारतात 3123 स्क्रिन्सवर रिलीज करण्यात आला आहे. पुढेही हा सिनेमा चांगली कमाई करेल असा अंदाज आहे.

अर्जुन रेड्डी हा सिनेमा 2017 साली रिलीज झाला होता. याचा हिंदी रिमेक होणार याची चाहत्यांना खूपच उत्सुकता होती. पहिल्या दिवशीच्या कमाईवरून हे सिद्ध होतंय की, चाहत्यांना खुश करण्यात हा सिनेमा यशस्वी झाला आहे. कबीर सिंह पाहण्यासाठी चाहेत थिएटरमध्ये गर्दी करताना दिसत आहे. फिल्म क्रिटीक्सना हा सिनेमा खास आवडला नाही. अर्जुन रेड्डीचा सिनेमा सीन सीन कॉपी केल्याने काहींनी हा सिनेमा खराब असल्याचं म्हटलं आहे.

सिने जगत –

‘माता-पिता की चरणों में स्वर्ग’ म्हणणाऱ्या ‘या’ अभिनेत्रीचा ‘वाढीव’ लुक पाहिलात का ?

…म्हणून सानिया मिर्झा, वीना मलिक यांच्यात ट्विटरवर ‘जुंपली’, पुढे झालं ‘असं’

‘कलंक’मुळे माझ्या करिअरला ‘कलंक’ : वरूण धवन

अभिनेत्री उशोशी सेनगुप्‍ता म्हणाली, गप्प बसली असते तर झाली नसती ‘छेडछाड’ ; ७ गुंडाना अटक

अभिनेत्रीने तिच्या हाताने उचलला तिचा लेहंगा, पुढे झाले असे काही

..म्हणून ‘बिग बॉस’ बॅन करण्यासाठी वकिलाची तक्रार दाखल

अभिनेता आयुष्यमान खुराणाची पत्नी ताहिराने ‘तेथे’ फोटो काढला, त्यानंतर मात्र,.