बॉक्स ऑफीसवर ‘कबीर सिंग’चा धुमाकूळ, ३ दिवसांत कमावले ‘इतके’ कोटी

मुंबई : पोलीसनामा ऑनलाईन – पहिल्या दिवशी २० कोटी रुपयांची कमाई करून खाते उघडल्यानंतर ‘कबीर सिंग’ ची बॉक्स ऑफिसची कमाई अद्याप चालू आहे. ‘कबीर सिंग’ हा चित्रपट शाहिद कपूर आणि कियारा आडवाणी च्या करिअरमध्ये सगळ्यात मोठा चित्रपट आहे. दोन दिवसातच या चित्रपटाने ४२.९२ करोड कमाई केल्यानंतर पुन्हा रविवारी २७.९१ करोडोची कमाई केली. ‘कबीर सिंग’ चित्रपटाने या आठवड्यात ७०.८३ करोडोची कमाई केली आहे.

एनालिस्ट तरण आदर्शने ट्विट केले आहे की, कबीर सिंग चित्रपटाने बॉक्स ऑफीसवर तेजीने कमाई केली आहे. या चित्रपटाने मेट्रो सिटीज, मास बेल्ट, Tier-2, Tier-3 शहरांमध्ये मजबूत पकड बनवली आहे. शाहिदचा सगळ्यात जास्त कमाई केलेला पहिला चित्रपट आहे. पहिल्या दिवशी शुक्रवारी २०.२१ करोड, शनिवारी २२.७१, रविवारी २७.९१ करोडोची कमाई केली आहे.

कबीर सिंहने अजय देवगन स्टार चित्रपट टोटल धमालच्या ओपनिंग वीकेंड कलेक्शन (६२.४० करोड) ला मागे पाडले आहे. शाहिद कपूरचा हा चित्रपट २०१९ चा सगळ्यात मोठा नॉन हॉलिडे ओपनर बनला आहे. हा चित्रपट देशभरात ३१२३ स्क्रिन्सवर प्रदर्शित झाला आहे.

कबीर सिंग तेलगू ब्लॉकबस्टर ‘अर्जुन रेड्डी’ चा हिंदी रिमेक आहे. यामध्ये एक पागल प्रेमीची कहानी आहे. चित्रपटात शाहिदने खूप छानप्रकारे भूमिका पार पाडली आहे. कियारा आडवाणी आणि शाहिद कपूरच्या केमिस्ट्रीने चाहत्यांचे मन जिंकले आहे.

आरोग्यविषयक वृत्त

केस काळे ठेवण्यासाठी हे “प्राणायम” करते मदत

वजन कमी करण्यासाठी “व्हिटॅमिन डी ” उपयुक्त

घरगुती उपायांनी काढा चेहऱ्यावरील नको असलेले केस

मनुष्य शरीरातील हाडांविषयी हे माहित आहे का ?