कबीर सिंगमधील ‘या’ मराठमोळ्या अभिनेत्रीचे ‘न्यूड’ फोटोशूट, सोशल मीडियात फोटो व्हायरल

0
280

मुंबई : पोलीसनामा ऑनलाइन – शाहिद कपूर आणि कियारा अडवणी यांची प्रमुख भूमिका असलेल्या कबीर सिंग चित्रपट खूप गाजला. या चित्रपटाची कथा, कलाकारांचा अभिनय प्रेक्षकांना चांगलाच भावला होता. या चित्रपटातील गाण्यांना तर प्रेक्षकांनी अक्षरश: डोक्यावर घेतले होते. याच चित्रपटात एका मराठमोळ्या अभिनेत्रीने काम केले होते. या अभिनेत्री चित्रपटामध्ये मोलकरणीचे काम केले होते. आणि मोलकरणीवर चित्रीत करण्यात आलेला एक सीन लोकांना प्रचंड आवडला होता.

https://youtu.be/D6fnhmIpWro

कबीर सिंग चित्रपटात शाहिदच्या घरात काम करणाऱ्या मोलकरणीच्या हातून चुकून काचेचे ग्लास फुटतो, त्यावर शाहिद तिच्या मागे मारायला धावतो. घरापासून ते बिल्डिंगच्या गेटपर्यंत ही मोलकरीण जीव तोडून धावते. या चित्रपटात ती मोलकरीण केवळ काहीच दृष्यांमध्ये असली तरी ती मोलकरीण प्रेक्षकांना चांगलीच लक्षात राहिली होती. या चित्रपटातील या मोलकरणीच्या भूमिकेत एका मराठी अभिनेत्री झळकली होती.

वनिता खरात असे या अभिनेत्रीचे नाव असून सध्या ती सोशल मीडियावर चांगलीच चर्चेत आहे. तिने सोशल मीडियावर एक पोस्ट केलेल्या एका फोटोमुळे सध्या वनिताची चर्चा रंगू लागली आहे. विनिताने एका कॅलेंडरसाठी चक्क न्यूड फोटोशूट केले आहे. हा फोटो सोशल मीडियावर प्रचंड व्हायरल होत असून सामान्य लोकच नाही तर मराठी सिनेइंडस्ट्रीतील अनेकांनी यासाठी तिचे कौतुक केले आहे.

वनिता खरातने तिच्या इन्स्टाग्रामवर शेअर केलेला बोल्ड फोटो पाहून अनेकांच्या भूवया उंचावल्या. मात्र अशाप्रकारचे फोटोशूट करण्यामागचे एक खास कारण असल्याचे तिने तिच्या पोस्टद्वारे सांगितले. तिने या फोटोद्वारे एक महत्त्वाचा विषय मांडण्याचा प्रयत्न केला आहे. आपल्या वजनाचा न्यूनगंड कुठेही न बाळगता तिने हा फोटो इन्स्टाग्रामवर शेअर केला आहे.

वनिताने इन्सटाग्रामवर बोल्ड फोटो शेअर करताना लिहिले आहे की, माला माझ्या प्रतिभेचा अभिमान आहे. माझी आवड, माझा आत्मविश्वास, मला माझ्या शरीराचा अभिमान आहे… कारण मी, मी आहे. तिने हा फोटो शेअर केल्यानंतर काही तासांतच अनेकांनी लाईक्स केले आहे. तसेच काहींनी कमेंट देखील केले आहेत. वनिताचा हा फोटो प्रसिद्ध फोटोग्राफर तेजस नेरुरकर यांनी काढला आहे.