अभिनेता शाहिद कपूरच्या चाहत्यांना मोठा ‘झटका’, कारण…

मुंबई : पोलीसनामा ऑनलाईन – अभिनेता शाहिद कपूर आणि कियारा आडवाणी यांचा कबीर सिंह हा सिनेमाचा लवकरच रिलीज होणार आहे. या सिनेमामुळे शाहिद आणि कियारा दोघेही सध्या चर्चेत आहेत. या सिनेमात शाहिद कियारा सोबत रोमँस करताना दिसणार आहे. सिनेमाचा ट्रेलर पाहूनच कळते की, हा सिनेमा दमदार सिनेमा आहे. शिव्या, राग, प्रेम, सनकीपणा या सर्वांनी खचाखच भरलेला हा सिनेमा 21 जून रोजी प्रदर्शित होणार आहे. या सिनेमात शाहिद आणि कियाराचे अनेक किसिंग सीन आहेत.

शाहिदला कबीर सिंह या सिनेमाकडून खूपच अपेक्षा आहेत. या सिनेमासाठी शाहिदने प्रचंड मेहनत घेतल्याचे दिसत आहे. बॉलिवूड रिपोर्ट्सनुसार, हा सिनेमा सेंसॉर बोर्डाने ही पास केला आहे. या सिनेमाला कोणते सर्टीफिकेट दिले आहे. हे तेव्हा स्पष्ट झाले नव्हते. परंतु आता मात्र हे समोर आलं आहे की, या सिनेमाला अ‍ॅडल्ट सर्टीफिकेट देण्यात आले आहे. म्हणजेच ए सर्टीफिकेट देण्यात आले आहे. याचा अर्थ असा आहे की 18 वर्षांखालील कोणीही हा सिनेमा पाहू शकणार नाही.

या सिनेमाबाबत भाष्य करताना शाहिद म्हणाला होता की, “कबीर सिंह हा सिनेमा करणं म्हणजे माझ्यासाठी खूप मोठं शारीरिक आणि मानसिक आव्हान होतं. या सिनेमात माझे तीन वेगवेगळे लुक आहेत. यासाठी मला स्वत:ला मोठ्या प्रमाणात बदलावं लागलं आहे. यासाठी मला धुम्रपान करावं लागलं, दाढी वाढवावी लागली. कारण हे सगळं माझ्या भूमिकेची मागणी होती. माझ्या दिग्दर्शकाने मला जे काही करायला सांगितले त्याला करण्यासाठी मी पुन्हा विचार करत नव्हतो. त्यांनी जे सांगितले तसे मी करत गेलो.”

आरोग्यविषयक वृत्त

हस्त मुद्रेने घालवा मूळव्याध आणि युरिनची समस्या

पावसाळ्यात अनेकांना होते कावीळ; करा ‘हे’ उपाय

वजन कमी करण्यासाठी “व्हिटॅमिन डी ” उपयुक्त

प्रत्येक कुटुंबाकडे ‘मेडिक्लेम पॉलिसी’ असणे फायद्याचे

जुळी मुलं होण्यासाठी अनेक दांपत्य उत्सुक

घरगुती उपायांनी काढा चेहऱ्यावरील नको असलेले केस

सिने जगत –

…म्हणून सानिया मिर्झा, वीना मलिक यांच्यात ट्विटरवर ‘जुंपली’, पुढे झालं ‘असं’

‘कलंक’मुळे माझ्या करिअरला ‘कलंक’ : वरूण धवन