#Video : शाहिद कपूर आणि कियारा आडवाणी यांचे रोमॅंटिक गाणे प्रदर्शित

मुंबई : पोलीसनामा ऑनलाईन – बॉलिवूडचा प्रसिद्ध अभिनेता शाहिद कपूर आणि अभिनेत्री कियारा आडवाणी यांचा कबीर सिंहचे नवीन गाणे ‘मेरे सोनिया’ मेकर्सने प्रदर्शित केले आहे. या गाण्याला प्रेक्षकांची खुप पसंती मिळाली आहे.

या गाण्यामध्ये शाहिद कपूर आणि कियारा आडवाणी एकमेकांच्या प्रेमात डूबलेले दिसत आहे. गाण्यातील दोघांची केमिस्ट्री लोकांना खूप पसंत पडली आहे. हे गाणे प्रदर्शित होताच या गाण्याला हजारो व्यूज मिळाले आहे.

या गाण्यात शाहिद कपूर आणि कियारा आडवाणी यांच्यामध्ये किसिंग सीन दाखविण्यात आला आहे. हे गाणे रोमॅंटिक आहे. पहिल्यांदाच शाहिद आणि कियारा यांची जोडी पडद्यावर येत आहे. या दोघांचे गाणे चाहते खूप उत्साहाने पाहत आहे.

https://www.instagram.com/p/ByMfyCYBLjs/?utm_source=ig_embed

या गाण्याचे नवीन पोस्टर देखील प्रदर्शित झाले आहे. या पोस्टरमध्ये शाहिद आणि किराया फ्रेंच किस करताना दिसत आहे. हे पोस्टर पाहण्यासाठी देखील चाहते खुप उत्साही दिसत आहे. काही दिवसांपुर्वी कबीर सिंहचा ट्रेलर देखील प्रदर्शित झाला होता. याला देखील प्रेक्षकांची पसंती मिळाली होती. शाहिद कपूर आणि कियारा आडवाणी यांचा कबीर सिंह चित्रपट २१ जून ला प्रदर्शित होणार आहे.