ऑटो रिक्षामध्ये एन्जॉय करतेय अभिनेत्री कियारा आडवाणी (व्हिडीओ)

मुंबई : पोलिसनामा ऑनलाईन – अभिनेत्री कियारा आडवाणी तिच्या चंचल आणि गोड स्वभावासाठी ओळखली जाते. कियाराचा एक व्हिडीओ सोशल मीडियावर खूप व्हायरल होतो आहे. व्हिडिओमध्ये कियारा आडवाणी ऑटो रिक्षामध्ये बसून राइडचा आनंद घेतांना दिसते आहे. ऑटोमध्ये तिची कोरियोग्राफर शबीना खान देखील दिसून आली. कियारा ऑटोने यासाठी आली होती कारण तिची गाडी दुसऱ्या जागी पार्क केलेली होती. या मागे कारण काही असले तरी कियारा आडवाणीच्या या व्हिडीओला सोशल मीडियावर खूप पसंती मिळाली आहे.

लोक व्हिडीओला कमेंट करत कियाराची स्तुती करता आहेत. एका युजरने लिहिले की, कबीर की बंदी ऑटो रिक्शा में. चाहत्यांसाठी ही गोष्टी खूप आनंददायक असते की, त्यांचे आवडते स्टार्स खूप साधे आहेत. या आधी सारा अली खानचा देखील ऑटो राईड मधील एक फोटो खूप व्हायरल झाला होता. कियारा आडवाणीच्या वर्कफ्रंटबद्दल बोलायचे गेले तर, कियारा आडवाणी शेवट चित्रपट कबीर सिंग मध्ये दिसून आली होती.

चित्रपटामध्ये कियारा मुख्य भूमिकेत होती. चित्रपटाने बॉक्स ऑफिसवर चांगली कमाई केली. या व्यतिरिक्त कियारा चित्रपट कलंक मध्ये देखील दिसून आली होती. अपकमिंग प्रोजेक्ट्सबद्दल बोलायचे गेले तर ती अक्षय कुमार सोबत दोन चित्रपटांमध्ये दिसून येणार आहे.

आरोग्यविषयक वृत्त –

You might also like