गेल्या 10 वर्षातील अ‍ॅडल्ट सिनेमात कबीर सिंग ‘टॉप’वर ! इतर दहा सिनेमांची कमाई किती जाणून घ्या

पोलिसनामा ऑनलाइन –गेल्या काही वर्षांपासून बॉलिवूड सिनेमांचा अ‍ॅडल्ट कंटेटवर खूप जोर दिसून आला आहे. अनेक सिनेमे A सर्टिफिकेटसोबत रिलीज झाले आहेत. यात काही सिनेमांना प्रेक्षकांचंही प्रेम मिळालं आणि बॉक्स ऑफिसवरही हे सिनेमे चांगले चाललेत. गेल्या 10 वर्षांत आलेल्या अ‍ॅडल्ट सिनेमांबद्दल बोलायचं झालं तर कमाई आणि क्रिटिकच्या रिव्ह्युच्या बाबतीत कबीर सिंग हा सिनेमा सर्वात वर आहे.

अनेक सिनेमे असे आहेत जे 100 कोटीच्या क्लबमध्येही एन्ट्री करू शकले नाहीत. कबीर सिंगचं प्रेक्षक आणि क्रिटिक यांनी कौतुक तर केलंच सोबत हा सिनेमा 200 कोटींच्या क्लबमध्ये समाविष्ट झाला.

कबीर सिंगची नेमकी कमाई किती ?

एका रिपोर्टनुसार कबीर सिंगनं 278 कोटींची कमाई केली आहे. गेल्या 10 वर्षात कबीर सिंग व्यतिरीक्त कोणत्या अ‍ॅडल्ट सिनेमानं किती कमाई केली हेही जाणून घेऊयात.

1) कबीर सिंग (2019)- 278.24 कोटी

2) ग्रॅंड मस्ती (2013)- 102.50 कोटी

3) द डर्टी पिक्चर (2011)- 85 कोटी

4) वीरे दी वेडिंग (2018)- 83 कोटी

5) शुटआऊट अॅट वडाला (2013)- 62 कोटी

6) प्यार का पंचनामा 2 (2015)- 62 कोटी

7) उडता पंजाब (2016)- 59.60 कोटी

8) मलंग (2020)- 59.04 कोटी

9) डेली बेली (2011) 54 कोटी

10) हेट स्टोरी 3 (2015)- 53.50 कोटी