६५व्या राष्ट्रीय चित्रपट पुरस्कारात ‘कच्चा लिंबू’ ठरले ‘पक्का’

नवी दिल्ली : वृत्तसंस्था
भारतातील सर्व कला क्षेत्रातील कलावंताचे, तंत्रज्ञानाचे, अभिनेते, दिग्दर्शक सर्वजण ज्या पुरस्कारांची आतुरतेने वाट पाहात असतात त्यांची आज घोषणा झाली आहे. देशातील ६५ व्या राष्ट्रीय चित्रपट पुरस्कारांची घोषणा नुकतीच दिल्लीच्या शास्त्री भवनातील ‘पीआयबी कॉन्फरन्स रुम’ येथे सुरू आहे. चित्रपट क्षेत्रातील विविध विभागांसाठी हे पुरस्कार दिले जातात.

या वर्षीच्या पुरस्कार सोहळ्यातील परिक्षकांच्या ज्युरीचे नेतृत्व दिग्दर्शक शेखर कपूर यांनी केले. आनंदाची बाब अशी की, ६५ व्या राष्ट्रीय चित्रपट पुरस्कारांमध्ये मराठी चित्रपटांची चांगली सरशी झालेली दिसते. ‘मृत्यूभोग’ या मराठी चित्रपटाला सर्वोत्कृष्ट संकलनाचा,सुयश शिंदेच्या ‘मयत’ चित्रपटाला सर्वोत्कृष्ट लघुपटाचा पुरस्कार जाहीर झाला आहे.

सर्वोत्कष्ट मराठी चित्रपटाचा पुरस्कार प्रसाद ओकच्या ‘कच्चा लिंबू’ या चित्रपटाला मिळाल्याने मराठी चित्रपट सृष्टीत आनंदाचे वातावरण आहे. अभिनेत्री सोनाली कुलकर्णी आणि रवी जाधव यांच्या भूमिका असणाऱ्या या चित्रपटाने प्रेक्षकांसोबतच राष्ट्रीय पुरस्कारांच्या ज्युरींचीही मने जिंकलेली दिसत आहेत.