‘कडकनाथ’चा ‘या’ राज्यात देखील ‘बोलबाला’, ‘डिमांड’मध्ये असल्याने राज्य सरकारकडून विक्री, जाणून घ्या कारण

नवी दिल्ली : वृत्तसंस्था – मध्यप्रदेशच्या कमलनाथ सरकारने भेसळ करणाऱ्यांविरुद्ध मागील दोन महिन्यांपासून मोहीम उघडली आहे. त्यामुळेच कमलनाथ सरकारने कडकनाथ चिकन पार्लरची सुरुवात केली आहे. या ठिकाणी प्रसिद्ध असे कडकनाथ चिकन उपलब्ध करून दिले जात आहे. या सरकारचा उद्देश हा नागरिकांना शुद्ध आणि स्वच्छ चिकन उपलब्ध करून देण्याचा आहे, मात्र भाजप सरकार यामध्ये धर्माचा विषय काढून पाय घालत आहे.

आदिवासी तरुणांना रोजगार उपलब्ध करून देण्यासाठी आणि नागरिकांना शुद्ध खाद्यपदार्थ उपलब्ध करून देण्यासाठी कमलनाथ सरकारने हि योजना आणली आहे. सरकारच्या अखत्यारीत असलेल्या पशु खाद्यपदार्थ आणि कुकुटपालन विभागाने राजधानी भोपाळमध्ये हे चिकन पार्लर खोलले आहे. याठिकाणी प्रसिद्ध असे कडकनाथ चिकन आणि अंडी मिळत आहे. मात्र भाजपकडून यावर राजकारण सुरु झाले आहे. कडकनाथ कोंबड्याचे रक्त हे देखील काळे असते. तर सामान्य कोंबड्याचे रक्त हे लाल असते. कडकनाथ कोंबड्याचे मांस हे इतर कोंबड्यांपेक्षा जास्त चविष्ठ असते. तसेच यामुळे लैंगिक ताकद देखील वाढण्यास मदत होते. मध्यप्रदेशातील झाबुआमध्ये हि प्रजाती नष्ट होण्याच्या मार्गावर आली होती. त्यामुळे सरकारने त्याच्या शिकारीवर आणि विक्रीवर देखील बंदी आणली होती.

त्यानंतर आता त्यांची संख्या सामान्य झाली आहे. स्थानिक भाषेत त्याला कालीमासी देखील म्हटले जाते. या कोंबड्याचे माणसात मोठ्या प्रमाणात व्हिटॅमिन्स आढळून येतात. त्यामुळे मधुमेह असणाऱ्या व्यक्तींसाठी याचे मांस अतिशय औषधी समजले जाते. झाबुआच्या वैज्ञानिकांनी देखील भारतीय संघाचा कर्णधार विराट कोहली याला पत्र पाठवून भारतीय संघाच्या आहारात या कडकनाथ कोंबड्याच्या समावेश करण्याची विंनती केली होती.

दरम्यान, या कडकनाथ कोंबड्याच्या भाव हा 900 ते 1200 रुपये प्रतिकिलो आहे. तर कोंबडीची किंमत हि 3 ते 4 हजार रुपयांपर्यंत आहे. तसेच अंड्याची किंमत देखील 50 रुपयांपर्यंत आहे.