कदम विद्यालयाच्या वतीने इंदापूरात रस्ता सुरक्षा सप्ताहाचे आयोजन

इंदापूर : पोलीसनामा ऑनलाइन (सुधाकर बोराटे) – महामार्ग पोलीस इंदापूर यांच्या मार्गदर्शनाखाली रयत शिक्षण संस्थेच्या सौ. कस्तुराबाई श्रीपती कदम विद्यालय व ज्युनियर कॉलेजच्या वतीने रस्ता सुरक्षा जनजागृती निमित्त प्रभात फेरीचे आयोजन करण्यात आले होते. यामध्ये विद्यालयाचे प्राचार्य रामचंद्र पाटील यांच्या मार्गदर्शनाखाली विद्यालयातील सुमारे सातशे विद्यार्थ्यांनी या फेरीत सहभाग घेतला. 11 जानेवारी ते 17 जानेवारी दरम्यान रस्ता सुरक्षा सप्ताहाचे आयोजन करण्यात येते. यानिमित्ताने मुख्य बाजारपेठेतून प्रभात फेरी काढण्यात आली.

राम वेस-नेहरू चौक- खडकपुरा- नगरपालिका – हायवे मार्गे -शंभर फुटी रोड असा प्रभात फेरीचा क्रम होता. यावेळी महामार्ग सहाय्यक पोलीस निरीक्षक अभिजित अभंग यांनी वाहतूक सुरक्षा विषयी मार्गदर्शन केले. क्षुल्लक चुकांमुळे अनेक अपघात घडतात. अनेकांना आपले प्राण गमवावे लागतात. अनेकांना अपंगत्व येते. हे टाळण्यासाठी वाहन चालवताना योग्य ती खबरदारी घ्यावी. वेगाची मर्यादा सांभाळावी असे आवाहन त्यांनी केले.

रॅलीमध्ये सहभागी झालेल्या सर्व विद्यार्थ्यांना डोंबाळे प्लायवूड यांच्यावतीने पाणी व खाऊ वाटप करण्यात आले. विद्यालयातील कर्मवीर इन्ट्रॅक क्लब व रोटरी क्लब ऑफ इंदापुर यांनीही या उपक्रमात सक्रिय सहभाग घेतला. यावेळी इंदापूर रोटरी क्लब चे अध्यक्ष राकेश गणबोटे इंदापूर नगरपालिकेच्या नगराध्यक्ष अंकिता शहा, रोटरी क्लबचे संस्थापक उपाध्यक्ष मुकुंद शहा, मागील वर्षाचे अध्यक्ष ज्ञानदेव डोंबाळे, महेंद्र रेडके, प्रशांत भिसे, भीमाशंकर जाधव, हरीदास हराळे, वरकुटे रोटरी क्लबचे अध्यक्ष शशिकांत शेंडे, पर्यवेक्षक रघुनाथ वाहुळ, ज्येष्ठ शिक्षक शामराव कांबळे, क्रीडाशिक्षक सुनील मोहिते इत्यादी उपस्थित होते.