गोविंदाच्या ‘त्या’ पोस्टवर कादर खान यांच्या मुलाने दिली अशी प्रतक्रिया 

मुंबई : वृत्तसंस्था – नुकतेच निधन झालेले बॉलिवूडचे जेष्ठ अभिनेते, संवादलेखक, आणि पटकथाकार कादर खान यांच्या निधनामुळे बॉलिवूडच्या कलाकारांबरोबरच त्यांच्या चाहत्यांना  धक्का बसला आहे. त्यांच्या निधनानंतर सोशलमीडिया वरून अनेकांनी त्यांना श्रद्धांजली वाहिली. अभनेता गोविंदाने सुद्धा एक भावुक पोस्ट शेअर केली होती या पोस्ट मध्ये गोविंदा म्हणाला ‘ते माझे उस्तादच नव्हते तर माझ्यासाठी ते वडिलांच्या स्थानी होते. त्यांच्या परिसस्पर्शानं त्यांनी प्रत्येक सामान्य कलाकाराला सुपरस्टार बनवलं. त्यांच्या जाण्यानं मी खूप काही गमावलं आहे. त्यांच्या आत्म्याला शांती मिळो इतकीच प्रार्थना मी करतो’ असं लिहित गोविंदानं ती पोस्ट शेअर केली  गोविंदाने त्यांना आदरांजली वाहिली .

पण कादर खान यांचा मुलगा सरफराज याला मात्र गोविंदाचे हे शब्द जराही रूचले नाहीत. गोविंदा माझ्या वडिलांना पित्यासारखा मानायचा तर त्यांची प्रकृती बिघडल्यावर गोविंदाने त्यानां कितीदा फोन केला? इतक्या वर्षांत त्याने कितीदा त्यांची विचारपूस केली? असा संतप्त सवाल सरफराजने केला. गोविंदाने ना माझे वडिल हयात असतानां त्यांची चौकशी केली, ना ते गेल्यावर आम्हाला एक फोन करून सांत्वना व्यक्त करण्याचे सौजन्य दाखवले. हे चित्रपटसृष्टीचेच वास्तव आहे. इथे कुणीच खरे नाही. सगळे केवळ खोटा आव आणतात, असे सरफराज एका वृत्तसंस्थेला दिलेल्या मुलाखतीत म्हणाला.
सरफराज पुढे म्हणाला की, इंडस्ट्रीतील अनेकांशी माझ्या वडिलांचे जिव्हाळ्याचे संबंध होते. पण एकचं अशी व्यक्ति होती, जी माझ्या वडिलांना प्रचंड आवडायची, ती व्यक्ति म्हणजे, बच्चन साहब(अमिताभ बच्चन).  इंडस्ट्रीतील  कुणाची तुम्हाला सर्वाधिक आठवण येते, असे मी नेहमी त्यांना विचारायचो. यावर ते बच्चन साहब, हे एकच नाव घ्यायचे. माझ्या वडिलांनी अखेरच्या काळापर्यंत बच्चन साहेबांची आठवण काढली, हे बच्चन साहेबांपर्यंत पोहोचावे, अशी माझी इच्छा आहे.
तसेच भावुक होऊन सरफराज  म्हणाला, “माझे वडिल वारले तेव्हा त्यांच्या चेहऱ्यावर हसू होते. जगातील कोणत्याही इतर गोष्टींपेक्षा ते हसू मला जपून ठेवायचे आहे. त्यांच्या आयुष्यातील शेवटची वर्षे खूपच वेदनादायी होती.”
अमिताभ बच्चन आणि गोविंदा यांच्या सोबत अनेक चित्रपटात कादर खान यांनी काम केले आहे.  तसेच अमिताभ बच्चन याच्या चित्रपटातील संवाद आणि अनेक चित्रपटाची कथा त्यांनी लिहिली आहे. गोविंदाची प्रमुख भूमिका असलेल्या  कुली नंबर १, राजा बाबू,  साजन चले ससुराल यांसारख्या चित्रपटांच्या कथा त्यांनी लिहिल्याआहेत.
Loading...
You might also like