केडगाव येथील मटका अड्ड्यावर छापा, 54 हजार 740 चा मुद्देमाल जप्त तर 8 जणांवर गुन्हा

दौंड : पोलीसनामा ऑनलाइन (अब्बास शेख) – दौंड तालुक्यातील यवत पोलीस स्टेशन हद्दीमध्ये असणाऱ्या केडगाव येथे मटका आणि हारजित असा जुगार चालत असणाऱ्या अड्ड्यावर बारामतीचे अप्पर पोलिस अधीक्षक पथक आणि यवत पोलिसांनी छापा टाकत रोख रक्कम, मुद्देमाल जप्त केला असून आठ आरोपींवर गुन्हा दाखल केला आहे.

याबाबत मिळालेल्या माहितीनुसार बारामतीचे अप्पर पोलीस अधीक्षक जयंत मीना यांना केडगाव परिसरामध्ये मटका जुगार अड्डा चालवला जात असल्याची गोपनीय माहिती मिळाली होती. या माहितीवरून बारामती क्राईमचे पोलीस अधिकारी आणि यवतचे पोलीस अधिकारी व जवान यांनी नियोजन करून यवत हद्दीत असणाऱ्या केडगाव या ठिकाणी पाण्याच्या टाकी खाली छापा मारला. यावेळी त्यांना ४१,७४० रुपयांची रोख रक्कम, १३ हजार रुपयांचे तीन मोबाईल असा ५४,७४० रुपयांचा माल तेथे आढळून आल्याने त्यांनी तो जप्त केला. तसेच हा मटका जुगार अड्डा चालवणारे व खेळणारे आरोपी बाळासो दशरथ सोडनवर (मालक, फरार), रमेश पोपट मार्कड (मालक, फरार), मैदुद्दीन सिकंदर शेख (बुकी), संतोष भीमराव ताखमुखे, राजेंद्र शांतीलाल बंब, सुरेश पोपट पवार, समीर राजुभाई शेख, अब्दुल महिरुफ कादर यांच्यावर गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

सदरची कामगिरी ही पुणे ग्रामीणचे पोलीस अधीक्षक संदिप पाटील, बारामती अप्पर पोलीस अधीक्षक जयंत मीना यांचे मार्गदर्शनाखाली यवतचे पोलीस निरीक्षक भाऊसाहेब पाटील, बारामती क्राईम ब्रँचचे पोलीस निरीक्षक चंद्रशेखर यादव तसेच बारामती क्राईम ब्रँचचे पो.हवा. संदिप जाधव, सुरेंद्र वाघ, पो.ना. स्वप्नील अहिवळे, पो.कॉ. विशाल जावळे, पो.कॉ. शर्मा पवार, यवत पोलीस स्टेशनचे पो.हवा. पानसरे, विशाल जाधव, खबाले यांनी केली.

Visit : policenama.com