Kolhapur News : कागलमधील ‘या’ तरुणाला मिळणार तब्बल 82 लाखांची शिष्यवृत्ती

इचलकरंजी (कोल्हापूर) : पोलीसनामा ऑनलाइन – इचलकरंजी येथील डीकेटीई मधून फॅशन टेकनॉलॉजी पदवी प्राप्त विद्यार्थी शिवतेज गस्ती (रा.कागल) याची ‘मास्टर इन इंटरनॅशन बिझनेस’ या पदव्युत्तर अभ्यासक्रमासाठी ऑस्ट्रेलियातील युनिव्हर्सिटी ऑफ न्यू साऊथ वेल्स सिडनी या विद्यापीठात निवड झाली आहे. भारत सरकारच्या नॅशनल ओव्हरसीज स्कॉलरशिप योजनेतून त्याला आता तब्बल ८२ लाखांची शिष्यवृत्ती मिळणार आहे.

देशभरातून केवळ सहा विद्यार्थ्यांची निवड झाली आहे. यातील शिवतेज हा मूळचा कागलचा आहे. त्याचे विविध नॅशनल व इंटरनॅशनल जर्नल्समध्ये रिसर्च पेपर प्रसिद्ध झाले आहेत. परदेशात उच्चशिक्षण करण्यासाठी आवश्यक जी. आर. ई. व आय. ई. एल.टी. एस. या स्पर्धामध्ये उत्तम क्रमांकाने तो उत्तीर्ण झाला आहे. याबाबत शिवतेज म्हणाला की, डीकेटीई मधील अत्याधुनिक तंत्रज्ञानाने युक्त अशा लॅबोरेटरी, लायब्ररी याचा त्याला चांगला फायदा झाला. येथील अनुभवी प्राध्यापक वृंद व विशेष करून इंडस्ट्रियल प्रशिक्षण घेत असताना मिळालेला अनुभव यामुळे मी हे यश प्राप्त करू शकलो.