डोनाल्ड ट्रम्प यांच्या स्वागतासाठी ‘गायक’ कैलाश खेर गाणार ‘जय जय कारा’, म्हणाला – ‘मला शक्य झालं तर…’ (व्हिडीओ)

मुंबई : पोलीसनामा ऑनलाइन – अमेरिकेचे राष्ट्रपती डोनाल्ड ट्रम्प 24 फेब्रुवारी रोजी दोन दिवसांच्या भारताच्या दौऱ्यावर येणार आहेत. त्यांचं जोरदार स्वागत करण्यासाठी तयारीही सुरू करण्यात आली आहे. अहमदाबादच्या मोटेरा स्टेडियममध्ये नमस्ते ट्रम्प या खास कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले आहे. या कार्यक्रमात डोनाल्ड ट्रम्प आणि पंतप्रधान नरेंद्र मोदी लोकांना संबोधित करणार आहेत. या कार्यक्रमात प्रसिद्ध गायक कैलाश खेर हेदेखील सादरीकरण करणार आहेत.

24 फेब्रुवारी रोजी होणाऱ्या नमस्ते ट्रम्प कार्यक्रमाबद्दल एएनआयसोबत बोलताना कैलाश खेर यांनी सांगिलतं की, “या कार्यक्रमाची सुरुवात जय जय कारा जय जय कारा स्वामी देना साथ हमारा या गाण्यानं होणार आहे. अगड बम बम लहरी या गाण्यानं या कार्यक्रमाचा समारोप होणार आहे. मला शक्य झालं तर या गाण्यावर त्यांना(ट्रम्प) नाचवेल.” असंही ते म्हणाले.

अमेरिकेचे राष्ट्रपती डोनाल्ड ट्रम्प गुजरातला येण्याआधीच मोटेरा स्टेडियमची किलेबंदी झाली आहे. सुरक्षेसोबतच बॉम्ब पथकही तैनात करण्यात आलं आहे. ट्रम्प यांच्यासोबत त्यांची पत्नी मेलानिया ट्रम्प, मुलगी इवांका ट्रम्प आणि जावई असे सर्वजण भारताच्या दौऱ्यावर येणार आहेत.