धक्कादायक ! पोलिस निरीक्षकांनी आपल्या 2 मुलांना घातल्या गोळया, एकाचा मृत्यू तर ‘सुना’ देखील जखमी

कैथल : वृत्तसंस्था – जिल्ह्यातील पोलिस लाईनमध्ये इंस्पेक्टर पदावर तैनात असलेल्या सतवीर नावाच्या व्यक्तीने आपल्या दोन मुलांना गोळ्या घातल्या. यादरम्यान एका मुलाचा जागीच मृत्यू झाला तर बचावासाठी आलेल्या दोन्ही सूनाही जखमी झाल्या. जखमी मुलगा आणि दोन सुनांची प्रकृती चिंताजनक असून त्यांना रोहतक पीजीआय येथे दाखल करण्यात आले आहे. ही घटना घडल्यानंतर आरोपी पोलिस निरीक्षक घटनास्थळावरून फरार झाले.

माहितीनुसार, काल रात्री १२ च्या सुमारास इंस्पेक्टरचा मुलांशी कशावरून तरी वाद झाला. हा वाद इतका वाढला की इन्स्पेक्टरने त्याची परवाना रिव्हॉल्व्हर काढली आणि गोळीबार सुरू केला. या गोळीबारात एका मुलाचा जागीच मृत्यू झाला. याचदरम्यान दोन्ही  सूना देखील पोहोचल्या. त्या बचाव करू लागल्या. बचाव करताना त्यांनी छतावरून उडी मारली आणि यामुळेच त्यांना गंभीर दुखापतही झाली.

सर्व्हिस रिव्हॉल्वरने मारली गोळी
आरोपी पोलिस निरीक्षक क्वार्टरमध्ये राहत होते. त्यांनी त्यांच्या सर्व्हिस रिव्हॉल्व्हरने गोळी मारली. याबाबत ठाणे सिव्हिल लाइनचे प्रल्हाद सिंह यांनी पुष्टी केली आहे. त्यांनी सांगितले की, जखमींचे निवेदन घेण्यासाठी ते रोहतक पीजीआय येथे जात आहेत. त्यानंतरच इन्स्पेक्टरने असे का केले ते कळेल. सुरुवातीच्या तपासात हे प्रकरण घरगुती वादाबद्दल असल्याचे सांगितले जात आहे.

आरोपी इन्स्पेक्टरचा तपास करत आहेत पोलीस
पोलिसांनी आरोपी निरीक्षकाचा शोध सुरू केला असून आरोपींना लवकरच अटक केली जाईल, अशी माहिती पोलिसांनी दिली. सध्या पोलिस आरोपीचा शोध घेण्याबरोबर त्यांनी हे पाऊल का उचलले याचाही शोध घेण्याचा प्रयत्न पोलिस करत आहेत. जखमींच्या निवेदनानंतरच संपूर्ण वास्तव समोर येईल.

पोलीस कर्मचारी डिप्रेशनमध्ये आहेत का?
विशेष म्हणजे लॉकडाऊन सुरु झाल्यापासून आतापर्यंत हरियाणा पोलिसांचे कर्मचारी नैराश्यात असल्याचे दिसत आहे. कारण हिसार मध्ये सैनिक विक्रम याने आपल्या पत्नीची हत्या केली होती. तर रविवारी रात्री कैथलमध्ये इन्स्पेक्टर सतवीर यांनी आपल्या मुलांवर गोळ्या झाडल्या.