चाहतेही खरेदी करू शकतात काजल अग्रवालचा हनिमूनदरम्यान घातलेला ‘स्ट्रेपलेस टॉप-स्कर्ट’ ! जाणून घ्या किंमत

पोलीसनामा ऑनलाइन – साऊथ आणि बॉलिवूडमध्ये आपली ओळख निर्माण करणारी अ‍ॅक्ट्रेस काजल अग्रवाल (Kajal Aggarwal) हिनं 30 ऑक्टोबर रोजी उद्योगपती गौतम किचलू (Gautam Kitchlu)सोबत लग्न केलं. लग्नाला 9 दिवस पूर्ण झाल्यानंतर काजलनं हनिमूनसाठी पतीसोबत मालदीव गाठलं होतं. काही दिवसांपूर्वीच काजल मालदीवमध्ये हनिमून एन्जॉय करून परतली आहे. काजलनं हनिमूनचे अनेक फोटो सोशल मीडियावरून शेअर केले होते, जे व्हायरल झाले होते. यावेळी तिच्या फॅशन सेंसचीदेखील खूप चर्चा झाली.

हनिमून दरम्यान काजल एका स्काय ब्लू आणि व्हाईट कलरच्या स्ट्रेपलेस टॉप आणि स्कर्टमध्ये दिसली. यात ती खूपच बोल्ड आणि ग्लॅमरस दिसत होती. यावेळी तिची पतीसोबत रोमँटीक केमिस्ट्री दिसली. परंतु तुम्हाला माहीत आहे का काजलच्या या ड्रेसची किंमत किती आहे.

जर काजलच्या चाहत्यांना तिच्यासारखा ड्रेस खरेदी करायचा असेल, तर त्यांच्यासाठी गुड न्यूज आहे. या ड्रेसची किंमत फक्त 4200 रुपये एवढी आहे. टॉपची किंमत 1500 आणि स्कर्टची किंमत 2700 रुपये सांगितली जात आहे.

हनिमूनदरम्यान काजलचे अनेक सुंदर लुक पाहायला मिळाले. स्ट्रेपलेस टॉप-स्कर्टऐवजी काजल रेड कलरच्या वन स्ट्रॅप ड्रेसमध्ये दिसून आली होती.

या पालोमा ड्रेसची किंमत 13 हजार रुपये आहे. ड्रेसमध्ये काजल खूप गॉर्जियस दिसत होती. फोटोत ती बॅक फ्लाँट करताना दिसली होती.

 

You might also like