बिना मेकअपनंतर आता ‘HOT’ वनपीसमधील काजल अग्रवालचे फोटोज ‘VIRAL’

मुंबई : पोलीसनामा ऑनलाईन – गेल्या काही दिवसांपासून साऊथ आणि बॉलिवूड अ‍ॅक्ट्रेस काजल अग्रवाल चर्चेत असल्याचे दिसत आहे. तिने शेअर केलेल्या फोटोंमुळे आणि काही पोस्टमुळे काजल चांगलीच चर्चेत होती. अशातच आता पुन्हा एकदा तिने काही फोटो समोर आले आहेत. हे फोटो काजलने तिच्या इंस्टाग्राम अकाऊंटवरून शेअर केले आहेत. सध्या हे फोटो चांगलेच व्हायरल होत आहे. कारण यामध्ये काजल खूपच सुदंर दिसत आहे. काजल ऑफ शोल्डर हॉट वनपीसमध्ये दिसत आहे. गुलाबी रंगाच्या या ड्रेसने काजलच्या सौंदर्यात आणखी भर घातली आहे.

नुकताच काजलने बिनामेकअप फोटो शेअर केला होता. यात खास संदेश देणारी पोस्टही तिने लिहिली होती. तिचे याबद्दल कौतुकही झाले होते. कारण तिने सांगितले होते की आपण सर्वांना आहे तसे स्वीकारायला हवे. आता बिनामेकअपनंतर ती पुन्हा एकदा सुंदर लुकमध्ये समोर आली आहे. काजलचे हे फोटो सध्या व्हायरल होत असून तब्बल 6 लाखांहून अधिक लोकांनी तिच्या फोटोंना लाईक केले आहे.

तिच्या वर्कफ्रंटबद्दल सांगायचे झाले तर, काजल इंडियन 2 या तिच्या आगामी सिनेमात दिसणार आहे. हा सिनेमा हिंदी आणि तामिळ भाषेत असणार आहे. याशिवाय एके 97 (कन्नड), मेरूपा (तेलुगु) यांसारख्या सिनेमातही दिसणार आहे. काजल अजय देवगनसोबत सिंघम मध्ये तर अक्षय कुमारच्या स्पेशल 26 मध्येही दिसली होती.