काजोल-अजय देवगणची लाडकी ‘न्यासा’ कोरोनाची शिकार ? काय आहे सत्य ?

पोलीसनामा ऑनलाईन :कोरोनाग्रस्तांची संख्या दिवसेंदिवस वाढतच चालली आहे. यावर उपायम म्हणून आता सध्या देशात 21 दिवसांचा लॉकडाऊन लागू करण्यात आला आहे. बॉलिवूड सेलेब्सही सध्या आपापल्या घरातच आहेत. आज अभिनेत्री काजोल आणि अभिनेता अजय देवगण यांची मुलगी न्यासा हॉस्पिटलमध्ये स्पॉट झाली.

कोरोनची लागण झाल्यानंतर खोकला, ताप, शिंका अशी अनेक लक्षणं दिसून येतात. त्यामुळं अशी काही लक्षण आढळली की, लोक लगेचच डॉक्टरांना सल्ला घेताना दिसतात. असंच काहीसं न्यासाच्या बाततीत झालं.

एका इंग्रजी वृत्तानुसार, न्यासाला ताप आल्याचा त्रास जाणवला. यानंतर काजोल तिला लगेच रुग्णालयात घेऊन गेली. डॉक्टरांनी तिला तिची तपासणी केल्यानंतर ती नॉर्मल असल्याचंही सांगितलं आहे. किरकोळ ताप आहे असं सांगत डॉक्टरांनी तिला काही औषधं दिली.

न्याास मध्यरात्री हॉस्पिटलला जाताना दिसल्यानंतर काजोल आणि अजयच्या अनेक चाहत्यांना चिंता वाटू लागली. न्यासालाही कोरोनाची लागण झाली नसेल ना अशी भीती त्यांना वाटू लागली होती. कारण देशात कोरोनाग्रस्तांची संख्या वाढत जाताना दिसत आहे. एकामागोमाग एक कोरोनाची लागण झाल्याच्या बातम्या समोर येतान दिसत आहे. पंरतु न्यासा एकदम ठिक आहे. त्यामुळं चाहत्यांना नक्कीच दिलासा मिळाला असावा.

https://www.instagram.com/p/B-RGa-xBwiI/