कळसूबाई हरिश्‍चंद्रगड अभयारण्‍य क्षेत्रात काजवा महोत्‍सव

अहमदनगर : पोलीसनामा ऑनलाइन – अहमदनगर व नाशिक या दोन जिल्‍हयांच्‍या सीमेवर असलेल्‍या भंडारदरा, घाटघर भागातील कळसुबाई हरिश्‍चंद्रगड अभयारण्‍यक्षेत्रात पावसाळापूर्व काजवा किटकांची उत्‍पत्‍ती होण्‍यास सुरुवात झालेली आहे.

काजव्‍याचे लहानापासून मोठयापर्यत सर्वांनाच आकर्षण असते. माहे जून महिन्‍यात काजवा महोत्‍सव बघण्‍यासाठी मुंबई, पुणे, अहमदनगर, नाशिकसह आदि जिल्‍हयांमधून मोठया संख्‍येने पर्यटकांची पावले काजवा महोत्‍सवाकडे वळतात. अभयारण्‍य क्षेत्रात रात्रीच्‍या वेळी निशाचर वन्‍यप्राणी , पक्षी तसेच नैसर्गिक जैवविवि‍धतेला नुकसान होण्‍याची शक्‍यता असते.

पर्यटकांनी अभयारण्‍यक्षेत्रात प्रवेश करतांना वन्‍यविभागाच्‍या नियमांची काटेकोरपणे अंमलबजावणी करण्‍यात यावी. भंडारदरा वनपरिक्षेत्राकडून मुतखेल नाका, शेंडी-घाटघर नाका या ठिकाणी पर्यटकांना नियम व सूचनांचे पत्रकांचे वाटप करण्‍यात येत आहे. अभयारण्‍यात प्रवेशाची वेळ रात्री 9 वाजेपर्यंत निश्चित करण्‍यात आली असून यानंतर कोणालाही प्रवेश दिला जाणार नाही. तसेच अभयारण्‍यातून रात्री 12 वाजेच्‍या अगोदर पर्यटकांनी बाहेर पडावे. यानंतर अभयारण्‍य क्षेत्रात कोणीही पर्यटक वावरतांना दिसल्‍यास त्‍यांच्‍यावर वन्‍यजीव ( सरंक्षण) अधिनियम 1972 अंतर्गत कारवाई करण्‍यात येईल.

पर्यटकांनी काजवा बघण्‍याचा आनंद लुटतांना मुख्‍य रस्‍ता सोडून जंगलात दूर जावू नये. रात्रीच्‍या वेळी वन्‍यप्राण्‍यांकडून हल्‍ला होण्‍याचा धोका असून तसे झाल्‍यास त्‍याची सर्वस्‍वी जबाबदारी संबंधित पर्यटकांची असेल. काजव्‍याचे निरीक्षण करताना ज्‍या झाडावर काजवे चमकत आहेत. त्‍या झाडापासून सुरक्षित अंतर ठेवावे.

काजव्‍यांना कोणत्‍याही प्रकारचा धोका होईल असे गैरकृत्‍य करु नये. अभयारण्‍यात प्रवेश केल्‍यानंतर वाहनांचे दिवे मंद स्‍वरुपात ठेवावे. अनावश्‍यकरीत्‍या हॉर्नचा वापर व पर्यटकांना अडथळा निर्माण होईल असे वाहने उभी करु नये. अभयारण्‍यात कुठल्‍याही प्रकारचे ज्‍वालाग्रही पदार्थ बाळगू नयेत. तसेच धुम्रपान व मद्यपान कटाक्षाने टाळावे. अन्‍यथा कायदेशीर कारवाई करण्‍यात येईल. असे वनसंरक्षक (वन्‍यजीव) नाशिकचे वरसंरक्षक अ.मो. अंजनकर यांनी एका प्रसिध्‍दी पत्रकान्‍वये कळविले आहे.

आरोग्य विषयक वृत्त – 

लठ्ठपणामुळे होऊ शकतात ‘हे’ १० गंभीर आजार

गरोदरपणातील समज-गैरसमज ? जाणून ‘घ्या’ सत्य

यामुळेही वाढू शकतो ‘टाइप-२ डायबिटीस’चा धोका

केसांसह त्वचेसाठीही आवळा गुणकारी ; रसाने त्वचा होईल गोरी