Kalakaranchi Gudi | अभिनेते क्षितिज दाते व ऋचा आपटे-दाते यांच्या हस्ते कलाकारांची ‘सांस्कृतिक गुढी’ची उभारणी

पुणे : Kalakaranchi Gudi | अखिल भारतीय मराठी नाट्यपरिषद कोथरूड शाखेतर्फे (Akhil Bharatiya Marathi Natya Parishad Kothrud Pune) पुण्याचे यशवंतराव चव्हाण नाट्यगृह येथे आज गुढी पाडव्याच्या शुभमुहूर्तावर अभिनेते क्षितीज दाते व ऋचा आपटे-दाते यांच्या हस्ते कलाकारांची ‘सांस्कृतिक गुढी’ (Kalakaranchi Gudi) उभारण्यात आली.

गेली १० वर्षे हा उपक्रम चालू आहे. या प्रसंगी अ.भा. भारतीय मराठी नाट्य परिषद, कोथरूड शाखेचे अध्यक्ष व संयोजक सुनील महाजन (Sunil Mahajan), माजी महापौर मुरलीधर मोहोळ (Muralidhar Mohol), शिवसेनेचे गटनेते पृथ्वीराज सुतार, पिंपरी-चिंचवड नाट्यपरिषदेचे अध्यक्ष भाऊसाहेब भोईर, अ. भा. मराठी चित्रपट महामंडळाचे अध्यक्ष मेघराज राजे भोसले, तळेगाव-दाभाडे नाट्यपरिषदेचे अध्यक्ष सुरेश धोत्रे, नाट्य व्यवस्थापक समीर हम्पी आणि सत्यजित धांडेकर, नाट्यगृहांचे व्यवस्थापक विजय शिंदे, बालरंग भूमीचे अध्यक्ष प्रकाश पारखी यांबरोबरच अनेक नामवंत कलावंत, बॅक स्टेज आर्टिस्ट, नाट्यगृहांशी संबंधित कर्मचारी मोठ्या संख्येने उपस्थित होते. (Kalakaranchi Gudi)

यावेळी संयोजकांना धन्यवाद देऊन क्षितिज दाते म्हणाले कि, ‘दरवर्षी नवीन नाटकांची गुढी यानिमित्त उभारली जाते. कलाकारांची ‘सांस्कृतिक गुढी’ ही महाराष्ट्रात केवळ पुण्यातच उभारली जाते हे विशेष आहे.
पुण्याप्रमाणेच कोथरूड परिसर देखील आता सांस्कृतिक उपक्रमांचे मोठे केंद्र बनले आहे.
किंबहुना कोथरूडला सांस्कृतिक उपक्रमांचे माहेरघरंच मानले जाते. पुण्यात नाटकांना मोठा प्रतिसाद मिळतो त्यामुळे आम्हा कलाकारांचा हुरूप वाढतो असे ते म्हणाले. (Kalakaranchi Gudi)

पुणे महानगरपालिकेतर्फे सांस्कृतिक उपक्रमांना प्रोत्साहन देऊन नेहमीच मदत केली जाते व यापुढेही केली जाईल
असे याप्रसंगी पुण्याचे माजी महापौर मुरलीधर मोहोळ यांनी सांगून म्हंटले की,
‘पुण्याची शान असणारे बाल गंधर्व रंग मंदिर देखील लवकरच नव्या व आकर्षक स्वरूपात रसिक प्रेक्षकांच्या समोर येईल.’

कोथरूडमधील यशवंतराव चव्हाण नाट्यगृहाचे शेजारी हिंदूहृदयसम्राट बाळासाहेब ठाकरे नाट्यगृह पुणे
महानगरपालिकेतर्फे उभारले जात असून त्याचे उद्घाटन लवकरच होईल.
नाट्य रसिकांची मोठी गरज त्यामुळे भागेल असे शिवसेना (ठाकरे गट) मनपा गट प्रमुख पृथ्वीराज सुतार यांनी सांगितले.

या प्रसंगी अ. भा. मराठी मध्यवर्ती नाट्य परिषदेच्या नवनिर्वाचित सदस्यांचा सत्कार याप्रसंगी करण्यात आला. प्रारंभी कार्यक्रमाचे संयोजक सुनील महाजन यांनी प्रास्ताविक, समीर हम्पी यांनी स्वागत, सुनील महाजन यांनी सूत्र संचालन आणि आभार प्रदर्शन सत्यजित धांडेकर यांनी केले.

Web Title :  Kalakaranchi Gudi | Actors Kshitij Date and Richa Apte-Date set up Kalakaranchi ‘Cultural Gudhi’ of artists

Join our WhatsApp GroupTelegramfacebook page and Twitter for every update

हे देखील वाचा

Pune Crime News | 3 लाखांच्या कर्जाचे 4 लाख 20 हजार परत केल्यानंतरही आणखी 10 लाखांची मागणी; पैसे न दिल्यास गहाण ठेवलेली गाडी पेटवून देण्याची धमकी, दोघा सावकारांवर गुन्हा दाखल

Nitin Gadkari Threat Case | नितीन गडकरींच्या धमकी प्रकरणाचं गूढ आणखी वाढलं, पोलीस आयुक्तांचा मोठा खुलासा

Devendra Fadnavis On Chaskaman | चासकमान कालव्याच्या कामासाठी लवकरच सुधारित प्रशासकीय मान्यता – देवेंद्र फडणवीस