कळंब : भाटशीरपुरा येथील शिवस्मारकास सर्वतोपरी मदत करणार : खा. छत्रपती संभाजी महाराज

कळंब : पोलीसनामा ऑनलाइन – युवराज छत्रपती संभाजी महाराज यांचा भव्य नागरी सत्कार, शिवस्मारक (शिवमंदिर) चे भूमिपूजन व विविध क्षेत्रातील मान्यवरांचा सत्कार सोहळा कळंब येथे संपन्न झाला. युवराज छत्रपती संभाजी महाराज यांनी यावेळी छत्रपती शिवाजी महाराज यांच्या पहिल्या मंदिराची स्थापना छत्रपती राजाराम महाराजांनी केली होती या धर्तीवर भाटशीरपुरा येथे स्थापन झालेल्या छत्रपती शिवाजी महाराज यांचे स्मारक (शिवमंदिर) हे शिवरायांच्या विचाराचे ऊर्जापीठ व्हावे, शिवस्मारकात वाचनालय अभ्यासिका असावी. कृषी शिक्षण, आधुनिक संगणक ज्ञान येथे असावे, या शिवस्मारकासाठी व गावच्या विकासासाठी कृतिशील आराखडा तयार करून द्यावा या शिव स्मारकासाठी लागणारी सर्वतोपरी मदत करण्याची ग्वाही यावेळी त्यांनी दिली

भाटशिरपुरा येथे छत्रपती संभाजी महाराज यांच्या हस्ते भूमिपूजन करण्यात आले. त्यानंतर छत्रपती संभाजी महाराज यांना मराठा विश्वभूषण पुरस्कार मिळाल्याबद्दल त्यांचा मानपत्र व स्मृतीचिन्ह देऊन गावकऱ्यांच्या वतीने सत्कार करण्यात आला तसेच विविध क्षेत्रातील

बि. बि. ठोंबरे – शिवछत्रपती कृषिगौरव पुरस्कार, पाणी फाउंडेशन टीम भाटशीरपुरा- संत गाडगेबाबा ग्राम गौरव पुरस्कार, उप विभागीय अधिकारी होळे मॅडम – राजमाता ताराराणी प्रशासकीय गौरव पुरस्कार, डाॅ. संदिप तांबारे & पल्लवी तांबारे – महात्मा ज्योती सावित्री कृषी क्रांती गौरव पुरस्कार, दिनेश वाघमारे – राजर्षी शाहू महाराज उद्योजकता गौरव पुरस्कार, स्व. गणपतराव कथले युवक आघाडी- लोकनेते कै. लिंबराज आबा गायकवाड समाजसेवा गौरव पुरस्कार देण्यात आले. त्यानंतर विशेष सत्कार म्हणून साहित्यिक काळवणे सर, शिक्षण साहित्यिक साकुळे सर, चित्रकार पंडित वाघमारे यांचा स्मृतीचिन्ह देऊन सत्कार करण्यात आला.

यावेळी डॉ.प्रतापसिंहपाटील, शिवाजी(आप्पा)कापसे, संभाजी ब्रिगेड जिल्हा अध्यक्ष अतुल गायकवाड, योगेश केदार, प्रदीप मेटे, सचिन काळे, रोहित पडवळ, दत्ता कवडे, तानाजी चौधरी, सागर बाराते यावेळी कार्यक्रम यशस्वी करण्यासाठी शिवस्मारक समितीचे मे.सूर्यकांत खापे, रमेश रितपुरे, आनंद गायकवाड, अंकूश, गायकवाड, आरेफ मुलानी, अकुंश गायकवाड, कोंडीबा कदम, मनोज गायकवाड, गुलाब शेख, रमेश उळगे आदी उपस्थित होते. कार्यक्रमाचे प्रास्ताविक संभाजी ब्रिगेड उस्मानाबाद जिल्हा अध्यक्ष अतुल गायकवाड, सूत्रसंचालन प्रतीक गायकवाड तर आभार सूर्यकांत खापे यांनी मानले.