कळंब पंचायत समितीच्या सभापतीपदी संगिता वाघे तर उपसभापतीपदी गुणवंत पवार

कळंब : पोलीसनामा ऑनलाइन – मंगळवारी सकाळपासूनच जिल्ह्याचे लक्ष कळंब पंचायत समितीच्या निवडी कडे लागले होते. सकाळपासूनच पंचायत समितीच्या परीसरात तणावपूर्ण शांतता होती. सकाळी दहा वाजल्यापासून सायंकाळी 3.50 पर्यत ही निवड प्रक्रिया चालू होती. आमदार कैलास पाटील कळंब येथे तळ ठोकून होते. तर राणाजगजितसिंह पाटील समर्थकही मोठ्या संख्येने उपस्थित होते.

या प्रकरीयेमधये सभापती पदासाठी शिवसेनेकडून नायगाव येथील संगिता गोविंद वाघे यांनी तर राणाजगजितसिंह पाटील समर्थकामधून गौर गणातील माने नंदूबाई हणुमंत यांनी नामनिर्देशन पत्र दाखल केले तर उपसभापती पदासाठी राष्ट्रवादी काँग्रेसचे जवळा येथील गुणवंत साहेबराव पवार यांनी तर राणाजगजितसिंह पाटील यांच्या समर्थकामधून देवळाली येथील रत्नदीप देशमुख यांनी नामनिर्देशन पत्र दाखल केले.

ही निवड हात उंचावून करण्यात आली यामध्ये सभापती पदासाठी सेनेच्या वाघे संगिता गोविंद यांना नऊ सदस्यांनी हात उंचावून पाठींबा दिला तर नंदूबाई हणुमंत माने यांना सात सदस्यांनी यामध्ये वाघे या सभापती पदावर विराजमान झाल्या.

तर उपसभापती पदासाठी राष्ट्रवादी काँग्रेसचे गुणवंत पवार यांना नऊ तर रत्नदीप देशमुख व यांना सात सदस्यांनी पाठींबा दर्शविला त्यामुळे उपसभापती पदासाठी गुणवंत पवार हे विराजमान झाले आहेत. पिठासण अधिकारी म्हणून नायब तहसीलदार अस्लम जमादार यांनी काम पाहिले.

या निवडीनंतर शिवसेना व राष्ट्रवादी काँग्रेसच्या वतीने फटाक्यांची आतषबाजी करण्यात आली यावेळी आमदार कैलास पाटील, शिवसेनेचे तालुकाप्रमुख शिवाजी कापसे, मिराताई चोंदे, रामलिंग आवाड, जिल्हा परिषदेचे सदस्य बालाजी जाधवर,बाबासाहेब मडके, दिपक जाधव, प्रा तुषार वाघमारे, तारेख मिर्झा, आदी उपस्थित होते

फेसबुक पेज लाईक करा – https://www.facebook.com/policenama/