कळंब तालुक्यातील मजुरांना पुणे पोलिसांकडून अन्यधान्य

पुणे : पोलिसनामा ऑनलाइन – देशात कोरोनामुळे अनेक कामगार अडकून पडले असून, त्यांच्या खाण्या पिण्याची देखील तारांबळ उडाली आहे. उस्मानाबाद जिल्ह्यातील कळंब तालुक्यात अडकून पडलेल्या अश्याच कामगारांना पुणे पोलिसांच्या झोन पाचमधून मदत पाठविण्यात आली आहे. साडे तीनशे पॅकेट देण्यात आले आहे.

कोरोना आजाराचा प्रादुर्भाव वाढू नये म्हणून देशात लॉकडाऊन करण्यात आले आहे. नागरिकांना घराबाहेर पडण्यास मनाई केली आहे. तर जिल्ह्यांच्या सीमा देखील बंद केल्या आहेत. त्यामुळे आप-आपल्या गावी जात येत नसल्याने अनेकजण अडकून पडले आहेत. त्यामुळे त्यांच्या खाण्या-पिण्याची स्थानिक प्रशासन आणि सामाजिक संस्था व कार्यकर्ते करत आहेत.

उस्मानाबाद जिल्ह्यातील कळंब तालुक्यात काही मजूर अडकून पडले आहेत. त्यामुळे कळंब तहसील कार्यालयाचे नायब तहसिलदार अस्लम जमादार यांनी व्हाट्सअपवर त्यांच्या ओळखीतील व्यक्तींना मदतीसाठी मेसेज केले होते. यावेळी मूळचे कळंब रहिवाशी आणि सध्या पुणे आयुक्तालयात वानवडी पोलीस ठाण्यात क्राईम पीआय (पोलीस निरीक्षक) सलीम चाऊस यांनी ही बाब पोलीस ठाणे आणि परिमंडळ पाचचे उपायुक्त सुहास बावचे यांना सांगितली.

त्यावेळी पोलीस उपायुक्त सुहास बावचे, पोलीस ठाण्याचे वरिष्ठ निरीक्षक क्रांतिकुमार पाटील, सलीम चाऊस व स्थानिक पोलिसांनी साडे तीनशे पॅकेट धान्य घेऊन पॅकेट तयार केले. तसेच ते कळंब तालुक्यात पाठविले. पुणे पोलिसांनी दाखविलेल्या या मदतीमुळे नायब तहसीलदार अस्लम जमादार यांनी पुणे पोलिसांचे आभार मानले आहेत. कळंब करानी देखील पुणे पोलिसांच्या या कार्याला सलाम ठोकला आहे.