Lockdown : विनाकारण रस्त्यावर फिरणार्‍या काही जणांना ‘प्रसाद’ तर अनेकांना उठाबशाची ‘शिक्षा’

कळंब : पोलिसनामा ऑनलाइन – संचारबंदी काळात विनाकारण वाहने घेऊन फिरणाऱ्या टवाळखोराना कळंबच्या महिला उपविभागीय अधिकारी यांनी चांगलाच धडा शिकवला. अनेकांना काठीचा प्रसाद दिल्यानंतर त्यांना उठबश्या देखील काढायला लावल्या. त्यामुळे शहरात वाहने घेऊन फिरणाऱ्यांच्या मनात भीती पसरली आहे.

कोरोना आजाराचा प्रादुर्भाव वाढू नये यासाठी राज्यात संचारबंदी जाहीर करण्यात आली आहे. नागरिकांना घरा बाहेर उडू नये अश्या सूचना देण्यात आल्या आहेत. मात्र अनेकजण विनाकारण वाहने घेऊन फिरत आहेत. ग्रामीण भागात हे प्रमाण जास्त आहे. त्यामुळे संचारबंदी आहे की नाही असा प्रश्न सर्व सामान्य नागरिक उठवत आहेत.

पोलीस रस्त्यावर उतरून कारवाई करत आहेत. गुन्हे देखील दाखल करण्यात येत आहेत. परंतु त्याचा परिणाम पडत नसल्याचे दिसत आहे. गुरुवारी कळंब तालुका महिला उपविभागीय अधिकारी अहिल्या गाठाळ व नायब तहसिलदार असलम जमादार तसेच पोलीस निरीक्षक तानाजी दराडे यांनी स्वतः रस्त्यावर उतरून या

टवाळखोरावर जोरदार कारवाई केली.
दुचाकी व कार चालकांना काठीचा प्रसाद दिलाच, पण अनेकांना चौकातच उठबश्या काढण्यास लावण्यात आल्या. यावेळी 30 ते 40 वाहनांवर दंडात्मक कारवाई करण्यात आली आहे. सकाळी ०७ ते ११ वाजेपर्यंत भाजीपाला खरेदीच्या नावावर मोठी गर्दी होते. त्यावर देखील नियंत्रण ठेवण्यासाठी गरज असल्याचे सर्व सामान्य नागरिकांनी सांगितले. तर दररोज ही कारवाई करावी अशी मागणी देखील करण्यात आली.
प्रशासनाच्यावतीने अत्यावश्यक काम असेल तरच घराच्या बाहेर पडा असे आव्हान करण्यात आले.