कोरोना आजार अन् पोलिसांच्या गस्तीचा खास रिपोर्ट

कळंब : पोलिसनामा ऑनलाइन – राज्यात कोरोना आजाराने थैमान घातले असून, दिवसेंदिवस याचा प्रादुर्भाव वाढत आहे. नागरिकांना घरात राहण्याच्या सूचना देण्यात आल्या असतानाही ते बाहेर पडत आहेत. पोलीस मात्र अश्या परिस्थितीत देखील रात्रंदिवस काम करत आहेत आणि त्याबाबतच पोलीसनामाकडून रात्र गस्तीबाबत खास बातचीत केली आहे. जिल्हाबंदीत चेकपोस्टवर एक अधिकारी 4 कर्मचारी व महसूल कर्मचारी तलाठी एक वैद्यकीय अधिकारी दोन आरोग्य कर्मचारी हे थांबून काम करत आहेत.

कोरोना आजाराने जगभरात थैमान घातले आहे. पूर्ण देश लॉकडाऊन करण्यात आले आहे. राज्यात संचारबंदी करण्यात आली आहे. मात्र नागरिक मला काही होणार नाही असे म्हणून बाहेर पडत आहेत. गरज नसताना घराबाहेर पडून भ्रमंतीच करत आहेत. जग या आजराने त्रस्त आहे. अश्या वेळी पोलीस आणि डॉक्टर आपला जीव धोक्यात घालून आपली सुरक्षा करत आहेत.

उस्मानाबाद जिल्ह्यात कळंब येथून बीड जिल्ह्याच्या सीमा येते. जिल्हा बंदीमुळे नागरिकांना दुसऱ्या जिल्ह्यात जाता येत नाही. जिल्हा सीमेवर पोलीस व आरोग्य विभाग रात्री आणि दिवसा एकत्र गस्त घालत आहेत.

ये पथक येणाऱ्या प्रत्येक वाहनांची तपासणी केली जात होती. नेमके येण्याचे कारण विचारणा केल्यानंतर त्यांची खरच अडचण असेल तरच त्यांना सोडण्यात येत होते. पूर्ण रात्र ही गस्त घातल्याने जिल्हाबंदीचा उद्देश खऱ्या अर्थाने पूर्ण होत होता.

यावेळी त्यांच्याशी बातचीत केल्यानंतर त्यांनी फक्त नागरिकांनी आमच्या सूचना ऐकव्यात प्रशासनाला सहकार्य करावे इतकीच अपेक्षा व्यक्त केली आहे. तर राज्यात कोरोणाबाधित रुग्णांची संख्या वाढत आहे. हा धोका सर्वांनी ओळखला पाहिजे. आपण घरात राहूनच सुरक्षित राहू शकतो.तरच या रोगावर नियंत्रण मिळवू शकतो. अश्या परीस्थित तुमच्यासाठी डॉक्टर, पोलीस विभाग जीव धोक्यात घालून काम करत आहेत.

डॉक्टर, नर्स, वार्डबॉय स्वतः च्या जीव धोक्यात तर घालत आहेतच पण त्यांच्या घरी देखील कोणतरी त्यांची वाट पाहत असताना ते आपल्यासाठी काम करत आहेत, याची जाणीव सर्वांनी ठेवली पाहिजे आणि प्रशासनाला सहकार्य केले पाहिजे अशी अपेक्षा व्यक्त केली आहे.
तरच आपण कोरोनाला हद्दपार करू, असे देखील यावेळी त्यांनी सांगितले.