कळंब तालुका पत्रकार संघाच्या वतीनं उल्लेखनीय काम करणार्‍या पत्रकारांचा गौरव

उस्मानाबाद (कळंब) : पोलीसनामा ऑनलाइन – कळंब तालुका पत्रकार संघाच्या वतीने पत्रकारितेच्या क्षेत्रात उल्लेखनीय काम करणाऱ्या पत्रकारांचा गौरव करण्यात येत असुन सन २०१८-१९ चे पत्रकारिता पुरस्कार विश्वस्त सतिश टोणगे व अध्यक्ष शितलकुमार घोंगडे यांनी नुकतेच जाहीर केले आहे.

कळंब तालुका पत्रकार संघाच्या वतीने सलग २० वर्षापासून पत्रकारितेच्या क्षेत्रात उल्लेखनीय काम करणाऱ्या पत्रकारांचा गौरव करण्यात येतो. त्यामुळे उस्मानाबाद जिल्ह्यात हा मानाचा पुरस्कार समजला जातो. पुरस्कार निवड करण्याच्या संदर्भात दिनांक २७ नोव्हेंबर रोजी जेष्ठ पत्रकार माधवसिंह राजपुत यांच्या अध्यक्षतेखाली बैठक घेण्यात आली.

यावेळी कै. शिवशंकर (बप्पा) घोंगडे जिल्हास्तरीय पत्रकारिता पुरस्कार अ‍ॅड. उपेंद्र कटके (दैनिक दिव्य मराठी, उस्मानाबाद), साप्ताहिक ‘पावनज्योत’चे संपादक कै. शि.म. ज्ञानदेव मोहेकर राज्यस्तरीय पत्रकारिता पुरस्कार मेघराज पाटील (एबीपी माझा वृत्त वाहिनी डिजीटल संपादक), कै. रा. ई. काकडे पुरस्कार शहाजी फुरडे पाटील (दैनिक लोकमत, बार्शी), कै. गणेश घोगरे ग्रामीण पत्रकारिता पुरस्कार आनंत खर्डेकर (दैनिक सकाळ, परंडा),  कलागौरव पुरस्कार तालमनी प्रताप आवाड, रुग्णसेवा पुरस्कार डॉ. रमेश जाधवर, समाज सलोखा पुरस्कार जगदंब प्रतिष्ठान (शेळका धानोरा, कळंब), उत्कृष्ट पत्रकार संघ पुरस्कार सक्रिय पत्रकार संघ (केज) यांना जाहीर करण्यात आला असुन लवकरच विविध मान्यवरांच्या हस्ते पुरस्कार वितरण करण्यात येणार आहे, अशी माहिती पत्रकार संघाचे विश्वस्त सतीश टोणगे व अध्यक्ष शितलकुमार घोंगडे यांनी दिली आहे. यावेळी सर्व पत्रकारांनी पुरस्कार प्राप्त पत्रकारांचे अभिनंदन केले.

Visit : Policenama.com