करण जोहरच्या ‘या’ चित्रपटाचे पोस्टर प्रदर्शित 

मुंबई : वृत्तसंस्था – मल्टीस्टारर ‘कलंक’ चित्रपटाची सध्या चर्चा आहे. या चित्रपटाचे दोन पोस्टर नुकतेच रिलीज झाले आहे. एका पोस्टरवर अभिनेता वरुण धवन आणि दुसऱ्या पोस्टरवर अभिनेता आदित्य रॉय कपूर दिसत आहे. दोघांच्याही चेहऱ्यावरचे भाव हे गंभीर आहेत.

करण जोहरने नुकतेच त्याच्या इंस्टाग्राम अकाउंटवरून हे दोन पोस्टर प्रदर्शित केले आहे. वरुण असलेल्या पोस्टरवर करणने लिहिलं आहे. ‘जफर च्या भूमिकेत वरुण धवन सादर आहे. जीवन आणि धोका यांच्यासोबत तो झुंजत असतो.’ या पोस्टरमध्ये वरुणच्या कानात बाळी, डोळ्यात काजळ आणि केस लांब दिसत आहे. तर दुसऱ्या पोस्टरमध्ये आदित्य आगीच्या समोर गंभीर आणि काहीसा खंबीरपणे उभा राहिलेला दिसत आहे.

तसेच याचित्रपटाविषयी सांगत करण जोहरने लिहिले आहे, या चित्रपटाचं स्वप्न आपण जवळपास १५ वर्षांपूर्वी पाहिल्याचं त्यानं म्हटलं. ‘हा एक असा चित्रपट आहे, ज्यावर मी सर्वस्व झोकून काम केलं आहे. हा चित्रपट माझ्या वडिलांचं स्वप्न होतं. असं स्वप्न ज्यावर त्यांनी या जगाचा निरोप घेण्यापूर्वी काम केलं आहे. हे स्वप्न मी तेव्हा पूर्ण करु शकलो नाही. पण, त्या स्वप्नाला एक दिशा मात्र नक्की मिळाली आहे….’, असं लिहित करणनं या चित्रपटाविषयीच्या भावना व्यक्त केल्या आहे.

धर्मा प्रॉडक्शनच्या अंतर्गत या चित्रपटाची निर्मिती होणार आहे. वरुण आणि आदित्यसह आलिया भट, सोनाक्षी सिन्हा, संजय दत्त, कुणाल खेमू, हितेन तेजवानी, माधुरी दिक्षित, संजय दत्त यांच्या मुख्य भूमिका आहेत. १९ एप्रिलला हा चित्रपट प्रदर्शित होईल.अभिषेक वर्मन यांनी चित्रपटाचे दिग्दर्शन केले आहे.

दीपिका आणि रणबीर कपूर पुन्हा एकत्र

Loading...
You might also like