PM मोदींची संपुर्ण मेहनत 2 दिवसात पाण्यात गेली, दिल्ली हिंसाचाराबद्दल बोलताना शिया धर्मगुरू मौलाना कल्बे जव्वाद यांनी सांगितलं

नवी दिल्ली : वृत्तसंस्था – शिया धर्मगुरू मौलाना कल्बे जव्वाद हे दिल्लीत झालेल्या हिंसाचारवर बोलले की, दिल्लीत झालेल्या हिंसेदरम्यान मी दोन वेळा दिल्लीला गेलो. दिल्लीतील हिंसाचाराची निष्पक्ष चौकशी व्हावी परंतु यासाठी सर्वोच्च न्यायालयाच्या देखरेखीखाली आतापर्यंत कोणतीही चौकशी झालेली नाही. लोक दुरूनच निवेदने देत आहेत पण जात कुणीच नाही. मशिदीला आग लावण्यात आली, कुराणसुद्धा पेटवण्यात आले, मुलांच्या बॅग व मदरसे जाळण्यात आले. याउलट मुस्लिम भागातील मंदिरांना मी बघितले त्यापैकी कोणतेच मंदीर जळालेले दिसले नाही. हिंदू भागात जे मुस्लिम होते त्यांना इजा पोहोचवण्यात आली. जेव्हा शिव बिहारला गेलो तर तेथे संपूर्ण भागात अंधार होता, मोबाईलच्या लाईटने आम्ही तेथील भागात फिरलो. तेथे ४ सिलेंडर फुटलेले होते. मशिदीच्या आतील सर्वात भयंकर देखावा म्हणजे तिथे दोन घरांना छप्परेच नव्हती.

ज्यांना त्रास होईल त्यांना आम्ही मदत करू
ते म्हणाले की आमच्याबरोबर जे लोक होते त्यांचे म्हणणे आहे की हे डायनामाइटद्वारे उडवले गेले आहे, संपूर्ण घटनाक्रमात आरडीएक्सचा वापर केला गेला आहे. इस्त्राईल जसे पॅलेस्टाईनमध्ये करतो, तशीच परिस्थिती दिल्लीत होती. आम्ही हिंदू बांधवांना देखील भेटलो, त्यात एक हिंदू बांधव म्हणाला की त्याच्या मुलालाही गोळ्या झाडून मारण्यात आले, आम्ही त्यांच्यासोबत देखील आहोत. ज्यांचावर छळ होईल आम्ही त्यांना मदत करू, मग तो हिंदू असो वा मुस्लिम, आम्ही सर्वांना साथ देऊ.

पंतप्रधानांनी सर्व दोषींना शिक्षा करावी
यादरम्यान मौलाना कल्बे जव्वाद म्हणाले की, दोषींना शिक्षा झाली तर आम्ही समजू की सरकार या संघर्षात सामील नाही. जर आरोपी पकडले गेले नाहीत तर मग आम्ही समजून घेऊ की सरकारने हे सर्व घडवून आणले आहे. दिल्लीतील हिंसाचाराबाबत निष्पक्ष चौकशी झाली पाहिजे. सर्वोच्च न्यायालयाच्या देखरेखीखाली कपिल मिश्रा ज्यांनी उलट सुलट विधाने केली त्यांना वाय (y) ग्रेटचे संरक्षण देण्यात आले. पंतप्रधान मोदींची संपूर्ण मेहनत २ दिवसात संपली. पंतप्रधानांनी सर्व दोषींना शिक्षा करावी. आम्ही त्यांना पैशाने नव्हे तर कायदेशीररित्या मदत करू.

आंतरराष्ट्रीय माध्यमांमध्ये देशाची परिस्थिती दर्शविली जात आहे
ते म्हणाले की आम्ही देशाचे गृहमंत्री अमित शहा आणि संरक्षणमंत्री राजनाथ सिंह यांना पत्र लिहून चौकशीची मागणी करू. शिया सुन्नी वक्फच्या चौकशीसाठी आम्ही मुख्यमंत्री योगी यांना ५ वेळा भेटलो. काही आरएसएसचे लोक हे वसीम रिझवी यांना जाऊन मिळालेले आहेत, त्यामुळे संपूर्ण जगात भारताची आणि सरकार व पोलिसांची थुथु होत आहे. आंतरराष्ट्रीय माध्यमांमध्ये देशाची परिस्थिती दर्शविली जात आहे, जर निष्पक्ष चौकशी झाली तर संपूर्ण जगाला एक चांगला संदेश जाईल.