पुणे : पोलीसनामा ऑनलाइन – समाजात तेढ निर्माण होईल असे प्रक्षोभक व चिथावणीखोर भाषण केल्याप्रकरणी पुणे पोलिसांनी (Pune Police) कालिचरण महाराज (Kalicharan Maharaj) याला अटक केली होती. न्यायालयाने आज 25 हजार रुपयांच्या जातमुचलक्यावर जामीन मंजूर (Bail Granted) केला आहे. न्यायालयीन कोठडीत (Judicial Custody) रवानगी झाल्यावर कालिचरण (Kalicharan Maharaj) याने गुरुवारी (दि.6) प्रथम वर्ग न्यायदंडाधिकारी एस.एस. रामदीन (S.S. Ramdin) यांच्या न्यायालयात जामिनासाठी अर्ज केला होता.
कालिचरण महाराजाने (Kalicharan Maharaj) दाखल केलेल्या जामीन अर्जावर सरकार पक्षातर्फे पोलीस व सहायक सरकारी वकील श्रीधर जावळे (Assistant Public Prosecutor Sridhar Javle) यांनी लेखी म्हणणे न्यायालयात सादर केले. आरोपीचा गुन्हा गंभीर स्वरुपाचा असून, त्याने दोन समाजात तेढ निर्माण करण्याचा प्रयत्न केला आहे. आरोपीला जामीन झाल्यास कायदा व सुव्यवस्थेचा (Law and Order) प्रश्न निर्माण होईल. या प्रकरणातील इतर आरोपी फरार आहेत. कालिचरणला जामीन झाला तर या आरोपींना मदत होईल. त्यामुळे जामीन नाकारण्यात यावा. त्यावर आज पुन्हा सरकार व बचाव पक्षातर्फे अंतिम युक्तिवाद झाला. कालिचरण याच्यावतीने अॅड. अमोल डांगे (Adv. Amol Dange) यांनी जामीन अर्ज दाखल केला होता.
समस्त हिंदू आघाडी (samast hindu aghadi) संघटनेकडून 19 डिसेंबर 2021 रोजी शुक्रवार पेठेतील नातूबाग मैदानावर (Natubagh) आयोजित ‘शिवप्रताप दिन अर्थात अफजलखान वधाचा आनंदोत्सव’ कार्यक्रमात दोन समाजात जातीय तेढ निर्माण होईल, असे प्रक्षोभक व चिथावणीखोर भाषण केले होते. याप्रकरणी कालिचरण याच्यासह पाच जणांवर खडक पोलीस ठाण्यात (Khadak police station) गुन्हा (FIR) दाखल करण्यात आला आहे. या गुन्ह्यात कालिचरण याला जयपूरवरुन ताब्यात घेण्यात आले होते. न्यायालयाने त्याला बुधवारी एक दिवसाची पोलीस कोठडी सुनावली होती.
Web Title :- Kalicharan Maharaj | kalicharan maharaj granted bail shivajinagar court pune pune police arrested him for making provocative statements
Join our WhatsApp Group, Telegram, facebook page and Twitter for every update