Kalicharan Maharaj | कालीचरण महाराज नेमके आहेत तरी कोण? त्यांचा महाराष्ट्राशी काय संबंध?

मुंबई : पोलीसनामा ऑनलाइन – राष्ट्रपिता महात्मा गांधी बद्दल (Mahatma Gandhi) अपशब्द वापरल्याने धर्मसंसद वादात अडकली असून यासोबतच एक नाव चर्चेत आलं ते कालीचरण महाराज (Kalicharan Maharaj) यांचे. कालीचरण महाराजाने (Kalicharan Maharaj) महात्मा गांधी यांच्याबद्दल अत्यंत आक्षेपार्ह वक्तव्य (Offensive Statement) करत शिवीगाळ केली. त्यामुळे मोठा वादंग उठला आणि महाराष्ट्रासह (Maharashtra) देशभरात वेगवेगळ्या ठिकाणी कालीचरण महाराजांवर गुन्हे (FIR) दाखल झाले. छत्तीसगडमध्ये (Chhattisgarh) दाखल झालेल्या गुन्ह्यात पोलिसांनी त्याला मध्य प्रदेशातून (Madhya Pradesh) बेड्या ठोकल्या आहेत. परंतु हा कालिचरण महाराज नेमका आहे तरी कोण? आणि त्याचा महाराष्ट्राशी काय सबंध आहे? जाणून घ्या.

छत्तीसगड पोलिसांनी अटक (Arrest) केलेला कालिचरण महाराज हा मूळचा महाराष्ट्रातील आहे. तो महाराष्ट्रातील अकोल्याचा (Akola) असून त्याचे खरे नाव अभिजीत धनंजय सारंग (Abhijeet Dhananjay Sarang) असे आहे. अकोल्यातील जुने शहर भागातील शिवाजीनगर भागातील भावसार पंच बंगल्याजवळ राहतो. त्याच्या आईचं नाव सुमित्रा तर वडिलांचे नाव धनंजय सारंग आहे.

कालिचरणचे शिक्षण

कालिचरण हा खोडकर स्वभावाचा असून त्याला शिक्षणाचा कंटाळा आल्याने त्याने आठवी पर्यंतचे शिक्षण घेतले. आई-वडिलांनी खूप प्रयत्न केले परंतु त्याचा काहीच फायदा झाला नाही. त्याची अध्यात्माकडे ओढ असल्याने शाळा सोडली आणि थेट हरिद्वार (Haridwar) गाठले. हरिद्वारला जाऊन त्याने दिक्षा घेतली. त्यानंतर पुढे हाच अभिजीत सारंग कालिचरण महाराज (Kalicharan Maharaj) म्हणून नावारुपास आला.

 

एका मुलाखतीत कालिचरण महाराजाने सांगितले की, मला शाळेत जाणं पसंत नव्हतं. शिक्षणात मला कोणताही रस नव्हता. जर मला जबरदस्तीने शाळेत पाठवलं तर मी आजारी पडायचो. सर्वजण माझ्यावर प्रेम करायचे त्यामुळे माझं म्हणणं ऐकायचे. माझी धर्माकडे ओढ असल्याने अध्यात्माकडे वळलो.

म्हणून कालिचरण नाव धारण केले

अभिजीत सांरंग उर्फ कालिचरण महाराज हा कालिभक्त आहे. त्यामुळे त्याने कालिचरण हे नाव धारण केले. कालिमातेला आई तर अगस्ती ऋषींना गुरु मानत असल्याचे तो सांगू लागला.
दोन वर्षापूर्वी अकोल्यातल्या पुरातन शिवमंदीरात शिवतांडव स्त्रोत्र म्हटलं
आणि व्हिडीओ व्हायरल झाल्याने कालिचरण महाराज प्रसिद्धीच्या झोतात
आला. 2017 मध्ये अकोला महापालिकेची निवडणुक
(Akola Municipal Corporation Election) देखील लढवली होती.
मात्र, या निवडणुकीत त्याला पराभावाचा सामना करावा लागला होता.

Web Title :- Kalicharan Maharaj | who is kalicharan maharaj arrested-over controversial statement on mahatma gandhi what is connection of kalicharan maharaj with maharashtra

 

Join our WhatsApp GroupTelegramfacebook page and Twitter for every update

 

हे देखील वाचा

 

Gulabrao Patil | हल्ल्यानंतर एकनाथ खडसेंचा शिवसेनेवर आरोप; गुलाबराव पाटलांनी केला पलटवार, म्हणाले…

Coronavirus in India | ‘कठोर पावले उचला, तरच तिसरी लाट…’, महाराष्ट्रासह 8 राज्यांना केंद्राचा अलर्ट

GST Returns | व्यापार्‍यांसाठी दिलासादायक ! GST रिटर्न दाखल करण्याची शेवटची तारीख वाढवली, जाणून घ्या 2022 मध्ये कोणत्या महिन्यापर्यंत फाईल करू शकता रिटर्न