Kalyan Crime News | इन्स्टाग्रामवरील मैत्री पडली महागात, गुंगीचे औषध देऊन आर्मी जवानाकडून महिला कॉन्स्टेबलवर अत्याचार

कल्याण : पोलीसनामा ऑनलाइन – Kalyan Crime News | सोशल मीडियावरील (Social Media) मैत्रीतून फसवणूक (Cheating) होण्याचे प्रकार दिवसेंदिवस वाढत चालले आहे. सोशल मीडियावर मैत्री (Friendship) करण आणि प्रेमसंबंध (Love Affair) निर्माण करणं तरुणीईचं फॅड झालं आहे. मात्र सोशल मीडियावर झालेल्या प्रेमसंबंधामुळे तरुणींवर भयंकर प्रसंगाच्या घटना घडल्या आहेत. अशीच एक घटना कल्याण (Kalyan Crime News) कोळसेवाडी परिसरात घडली आहे. इन्स्टाग्रामवर (Instagram) केलेली मैत्री एका महिला कॉन्स्टेबलला (Lady Constable) महागात पडली आहे. थंड पेयात गुंगीकारक औषध टाकून तिच्यावर बलात्कार (Rape) केल्याची धक्कादायक घटना घडली आहे.
याबाबत कोळसेवाडी पोलीस ठाण्यात (Kolsewadi Police Station) आर्मीत जवान (Army Jawan) असलेल्या प्रियकरावर अत्याचारासह विविध कलमांतर्गत पीडितेच्या तक्रारीवरुन गुन्हा (FIR) दाखल केला आहे. आकाश घुले (Akash Ghule) असे आरोपीचे नाव असून तो सध्या पुणे जिल्ह्यातील आर्मी कार्यालयात (Pune District Army Office) जवान म्हणून कार्यरत आहे. मिळालेल्या माहितीनुसार पीडित महिला मुंबई पोलीस (Mumbai Police) दलात पोलीस शिपाई (Police Constable) म्हणून कार्यरत असून त्या कल्याण पूर्वेत कुटुंबासह राहतात. तर आरोपी जवान हा मूळचा बीड जिल्ह्याचा रहिवासी आहे. (Kalyan Crime News)
पीडित महिलेची आणि आरोपीची 2021 मध्ये इन्स्टाग्रामवर ओळख झाली. त्यानंतर दोघात मैत्री झाली. आरोपीने आपण आर्मीत जवान असून तू कशी दिसते तुला मला पाहायचे आहे असे बोलून तिला प्रेमाच्या जाळ्यात ओढले. त्यानंतर वर्षभर त्यांच्यात प्रेमाचे सूत जुळल्याने त्यांचे मोबाईलवर बोलणे सुरु होते. मे 2022 मध्ये आरोपी आकाश हा पीडितेच्या घरी आला होता. त्यावेळी रात्रीच्या सुमारास पीडितेला गुंगीकारक औषध थंड पेयातून देऊन तिच्यावर बलात्कार केला. मात्र यानंतर त्याने लग्नाचे आमिष (Lure of Marriage) दाखवून पीडितेला शांत केले. यानंतर त्याने वर्षभर वारंवार शारिरीक संबंध प्रस्थापित केले.
यानंतर आरोपीने पीडितेला मोबाईलवर व्हिडिओ कॉल करुन सांगितले की, तू विवस्त्र होऊन व्हिडिओ समोर ये.
जर तू आली नाही तर मी दुसऱ्या मुलीसोबत लग्न करेन अशी धमकी देत, पीडितेला विवस्त्र होण्यास भाग
पाडल्याचे पीडितेने दिलेल्या तक्रारीत नमूद केले आहे. दरम्यान आरोपी त्याच्या मुळ गावी गेला.
पीडित महिलेने त्याच्याकडे लग्नाचा तगादा लावला असता त्याने जातीचे कारण देत लग्नास नकार दिला.
आरोपीने लग्नाला नकार दिल्यानंतर पीडित महिलेने बीड जिल्ह्यातील संबंधित पोलीस ठाण्यात धाव घेऊन आरोपी आकाश विरोधात तक्रार करण्यासाठी गेली.
मात्र आरोपीने तेथील पोलिसांसमोर लग्न करण्यास होकार दिल्याने तक्रार दिली नाही.
काही दिवसापूर्वी मी वेगळ्या जातीचा आहे, तू खालच्या जातीची असल्याचे कारण देत आरोपीने पुन्हा लग्नाला
नकार दिला. आपली फसवणूक झाल्याचे लक्षात आल्यानंतर पीडित महिलेने 25 मे रोजी कोळशेवाडी पोलीस
ठाण्यात तक्रार दिली. पोलिसांनी आकाशवर आयपीसी 376 (2)(एन), 328 तसेच अनुसूचित जाती जमाती
प्रतिबंधक कायद्यानुसार (Atrocities Act) गुन्हा दाखल केला असून पोलीस त्याचा शोध घेत आहेत.
Web Title : kalyan crime army jawan rape on ladies constable love story on instagram
Join our WhatsApp Group, Telegram, facebook page and Twitter for every update
हे देखील वाचा