Kalyan Crime | कल्याणमध्ये डॉक्टर दाम्पत्याला 56 लाखांचा गंडा; 4 विकसकांवर आरोप

कल्याण : पोलीसनामा ऑनलाइन – कल्याण डोंबिवली महापालिकेच्या वैद्यकीय विभागातील डॉक्टर पती-पत्नीची चार विकसकांनी मिळून गाळे विक्रीतून 56 लाखांची फसवणूक (Kalyan Crime) केल्याचा प्रकार उघडकीस आला आहे. याप्रकरणी महात्मा फुले पोलीस ठाण्यात चार विकसकांवर गुन्हा (Kalyan Crime) दाखल करण्यात आला आहे.

डॉ. पुरुषोत्तम टिके आणि डॉ. प्रज्ञा टिके अशी डॉक्टर दाम्पत्याची नावे आहेत. डॉ. पुरुषोत्तम टिके हे कल्याण डोंबिवली महापालिकेच्या रुक्मिणीबाई रुग्णालयाचे मुख्य वैद्यकीय अधिकारी आहेत, तर त्यांच्या पत्नी डॉ. प्रज्ञा टिके या वसंत व्हॅली येथील महापालिका रुग्णालयाच्या प्रमुख आहेत. कल्याण पश्चिममधील बेतुरकरपाडा येथील श्रीमूर्ती सोसायटी येथे दोन व्यापारी गाळे संजय पटेल यांनी राजेशकुमार महोनहरथप्रसाद शर्मा यांना विक्री केले होते. या दोन्ही गाळ्यांची विक्री झाली असूनही आरोपींनी संगनमत करून ते दोन्ही गाळे डॉ. पुरुषोत्तम आणि डॉ. प्रज्ञा टिके यांना एक कोटी 45 लाख रुपयांना विकले. या गाळ्यांचा नोंदणीकरण व्यवहार आरोपींनी संगनमताने करून दिला. अशाप्रकारे टिके दाम्पत्याची आरोपींनी 56 लाख 90 हजार रुपयांची फसवणूक केली. डॉक्टर दाम्पत्याने याप्रकरणी महात्मा फुले पोलीस ठाण्यात तक्रार दिली आहे. पोलिसांनी चौघांविरोधात गुन्हा दाखल करून घेतला असून, पोलीस उपनिरीक्षक डी. एम. वाघमारे या प्रकरणाचा तपास करीत आहेत.

मोहनलाल एस. पटेल, जतीन मोहनलाल पटेल, अंकित मोहनलाल पटेल (रा. कासारवडवली, घोडबंदर रोड, ठाणे)
आणि मनसुख वसानी अशी आरोपींची नावे आहेत.

Web Title :- Kalyan Crime | builders cheated doctor couple of kalyan dombivli municipal corporation for 56 lakh

Join our WhatsApp GroupTelegramfacebook page and Twitter for every update

हे देखील वाचा

Gold Prices | तज्ज्ञांचा अंदाज ठरत आहे खरा; जाणून घ्या सोन्याचे सध्याचे दर

Delnaaz Irani | शाहरुख खानच्या ‘कल हो ना हो’ चित्रपटातील ‘या’ अभिनेत्रीने व्यक्त केली मनातील खंत