Kalyan Crime News | तरुणीला वाचवायला गेलेल्या तरुणांना बॅट-दांडक्यांनी बेदम मारहाण

कल्याण : पोलीसनामा ऑनलाईन – Kalyan Crime News | कल्याणमध्ये एक धक्कादायक प्रकार घडला आहे. आरोपी तरुण कामावरुन घरी परतणाऱ्या एका तरुणीची भर रस्त्यात छेड काढून तिला मारहाण करत होते. यादरम्यान दोन तरुण पीडित तरुणीला वाचवण्यासाठी पुढे आले. मात्र आरोपींनी या 2 तरुणांना बॅट-दांडक्यांने बेदम मारहाण केली. कल्याणमधील मंगेशी पॅराडाईज परिसरामध्ये हि घटना घडली आहे. या प्रकरणातील जखमी व्यक्तींवर कल्याण डोंबिवली महापालिकेच्या रुक्मीणीबाई रुग्णालयात उपचार सुरु आहेत. योगेश चौधरी आणि उत्कर्ष सिंग असे जखमी व्यक्तींची नावे आहेत. या प्रकरणी पोलिसांनी 8 जणांच्या विरोधात गुन्हा दाखल केला असून 6 जणांना ताब्यात घेतले आहे. या प्रकरणातील मुख्य आरोपी अद्याप फरार आहे. (Kalyan Crime News)

काय आहे नेमके प्रकरण?

कल्याण पश्चिमेत राहणारी एक 22 वर्षीय तरुणी कामावरुन रात्री घरी परतत होती. या तरुणीला भर रस्त्यात प्रणव कोनकर याने तिला अडवले आणि तिची छेड काढली तसेच तिला मारहाण करायला सुरुवात केली. यानंतर पीडित तरुणीने आरडाओरडा केल्यावर दोन तरुण पीडित तरुणीच्या मदतीसाठी धावून आले. त्यांनी पीडितेला आरोपी पासून सोडविण्याचा प्रयत्न केला. याचा राग आल्याने प्रणवने त्याच्या मित्रांना बोलावून घेतले. यानंतर या सगळ्य़ांनी मिळून योगशे चौधरी आणि उत्कर्ष सिंग या दोघांना लाकडी दांडके आणि बॅटने बेदम मारहाण केली. या मारहाणीत योगेश याचे डोके फुटले आहे. तर उत्कर्ष याच्या हाताला गंभीर दुखापत झाली आहे. (Kalyan Crime News)

योगेश चौधरी आणि उत्कर्ष सिंग यांना उपचारासाठी तातडीने रुक्मीणीबाई रुग्णालयात दाखल केले.
तरुणीने दिलेल्या तक्रारीच्या आधारे खडकपाडा पोलिसांनी प्रवण कोनकर याच्यासह आठ जणांच्या विरोधात
गुन्हा दाखल केला आहे. यापैकी सहा आरोपींना पोलिसांनी ताब्यात घेतले आहे.
आरोपी तरुण हा पीडित तरुणीचा प्रियकर असून काही दिवसापूर्वी त्यांचा ब्रेकअप झालं होते.
याच रागातून त्याने पीडितेला मारहाण केली होती. प्रणव प्रदीप कोनकर (वय 25),दर्शन प्रदीप कोनकर
(वय 20),हेमंत राजा कोट (वय 19),सनी पुंडलिक मालवी (वय 25),अमन चिन्नू जयस्वाल (वय 20),
प्रेमसिंग भागवत पाटील (वय 17) अशी अटक करण्यात आलेल्या आरोपींची नावे आहेत.
त्यांच्यावर खडकपाडा पोलीस स्टेशन गुर क्रमांक 99/2023 कलम 143, 145, 147, 149, 427, 504, 354,
354(A) अंतर्गत गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

Web Title :- Kalyan Crime News | two youths beaten who trying to save girl from boys gang in khadakpada kalyan

Join our WhatsApp GroupTelegramfacebook page and Twitter for every update

हे देखील वाचा

Pune GST Department | खळबळजनक ! भंगार व्यावसायिकाने घातला घोळ, तब्बल साडेबारा कोटींचा जीएसटी बुडविला

Summer Weight Loss Tips | केवळ कडक उन्हापासूनच वाचवणार नाही, तर पोटाची चरबी आणि एक्स्ट्रा बॉडी फॅटसुद्धा कमी करतील ‘या’ 2 गोष्टी

Kolhapur Crime News | बाप होऊ शकलो नाही ! तरुण डाॅक्टरची आत्महत्या; कोल्हापूरमधील घटना