Kalyan Lok Sabha | एकनाथ शिंदेंना कल्याणमध्ये मोठा धक्का, जिल्हाप्रमुखांच्या राजीनाम्याने खळबळ, पक्षाकडून अपमानास्पद वागणूक

कल्याण : Kalyan Lok Sabha | एकनाथ शिंदे (Eknath Shinde) यांच्या शिवसेनेला (Shivsena) कल्याणमध्ये मोठा धक्का बसला आहे. येथील कल्याण-मुरबाड (Kalyan Murbad) जिल्हाप्रमुख अरविंद मोरे (Arvind More) यांनी अपमानास्पद वागणूक मिळाल्याचे कारण सांगत राजीनामा दिला आहे. मतदानासाठी चार-पाच दिवस बाकी असताना जिल्हाप्रमुखांनी दिलेल्या या राजीनाम्यामुळे पक्षात खळबळ उडाली आहे.

जिल्हाप्रमुख असूनही अरविंद मोरे यांना पंतप्रधान नरेंद्र मोदी (PM Narendra Modi) यांच्या सभेत व्यासपीठावर स्थान नाकारण्यात आले आहे. हा अपमान मोरे यांच्या जिव्हारी लागल्याची चर्चा सर्वत्र सुरू होती. अखेर नाराज मोरेंनी जिल्हाप्रमुख पदाचा राजीनामा दिला आहे.

झालेल्या अपमानाबाबत प्रतिक्रिया देताना अरविंद मोरे म्हणाले, मोदींच्या सभेत व्यासपीठावर शहरप्रमुख, आमदार, माजी आमदारांना स्थान देण्यात आले आहे. पण मला मात्र जणीवपूर्वक व्यासपीठावर स्थान देण्यात आलेले नाही.

सभेचे यजमान असलेल्या जिल्हाप्रमुखालाच अपमानास्पद वागणूक मिळाल्याने येथे मोरे समर्थकांमध्ये नाराजीचा सुर आहे.
मतदानाच्या ५ दिवसांअगोदर मोरेंनी राजीनामा दिल्यामुळे शिंदे गटासाठी हा मोठा धक्का आहे.

याबाबत अरविंद मोरे यांनी मुख्यमंत्री शिंदे यांना पत्र लिहिले असून
कल्याण मुरबाड जिल्हाप्रमुख पदाचा राजीनामा स्विकारण्याबाबत विनंती करताना म्हटले आहे
की, कल्याणमध्ये आज पंतप्रधान मोदींची सभा होत आहे.
यावेळी स्टेजवरील निमंत्रीत पदाधिकाऱ्यांमध्ये जिल्हाप्रमुख म्हणून नाव नसल्याचे पाहून वाईट वाटले.

शिवसेना पदाच्या प्रोटोकॉलप्रमाणे यजमान जिल्हा प्रमुखास स्टेजवर उपस्थित राहण्याचा मान मिळायला हवा होता.
परंतु जाणिवपूर्वक मला डावलले आहे, असे मोरे यांनी पत्रात म्हटले आहे.

Join our WhatsApp GroupTelegramfacebook page and Twitter for every update

हे देखील वाचा

Mumbai North Lok Sabha | उत्तर मुंबई मतदारसंघात मराठी-अमराठी हे प्रचारातील मुद्दे गोयल यांच्यासाठी त्रासदायक

Swargate Pune Crime news | खुनाच्या प्रयत्नातील फरार आरोपीला स्वारगेट पोलिसांकडून अटक

Amit Shah | अमित शहांचा मोठा दावा, ‘पंतप्रधान नरेंद्र मोदींना चौथ्या टप्प्यातच बहुमत मिळाले’ (Video)