Kalyan Lok Sabha Election 2024 | मुख्यमंत्री शिंदेंच्या मुलाविरूद्ध लढणार ठाकरेंची ‘ही’ रणरागिणी, शिवसेनेकडून आणखी 4 उमेदवार जाहीर

मुंबई : Kalyan Lok Sabha Election 2024 | जागावाटपाच्या तिढा आणि भाजपाने (BJP) यापूर्वी केलेले सहकार्य अशा कैचीत सध्या शिवसेना शिंदे गटाचे (Shivsena) प्रमुख एकनाथ शिंदे (Eknath Shinde) अडकले आहेत. अजूनही त्यांना कल्याण लोकसभा मतदारसंघातून स्वताच्या मुलाची उमेदवारी जाहीर करता आलेली नाही. तर दुसरीकडे शिवसेना ठाकरे गटाने (Shivsena UBT) याच मतदारसंघातून वैशाली दरेकर (Vaishali Darekar) यांना आज उमेदवारी जाहीर करून मुख्यमंत्री शिंदेंसमोर मोठे आव्हान उभे केले आहे.

शिवसेना पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांनी आज चार जागांवरील उमेदवारांची नावे जाहीर केली. कल्याण लोकसभा मतदारसंघ – वैशाली दरेकर, पालघर लोकसभा मतदारसंघ – भारती कामडी, जळगाव – करण पवार, हातकंणगले – सत्यजित पाटील हे चार उमेदवार जाहीर केले आहेत.

वरील चारपैकी वैशाली दरेकर यांच्या नावाची सध्या जोरदार चर्चा सुरू झाली आहे. कारण त्या महाराष्ट्राचे मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांचे पुत्र खासदार श्रीकांत शिंदे यांच्या विरूद्ध लढणार आहेत. कल्याण लोकसभा मतदारसंघ हा शिवसेनेचा बालेकिल्ला आहे. परंतु, शिवसेनेत फूट पडल्यानंतर शिंदे गटाने येथे कब्जा केला.

वैशाली दरेकर या शिवसेनेच्या फायर ब्रँड महिला नेत्या म्हणून परिचित आहेत. त्यामुळे या निवडणुकीत त्या श्रीकांत शिंदे यांना मोठी टफ फाइट देण्याची शक्यता वर्तवली जात आहे. यावेळी उद्धव ठाकरे यांना काँग्रेस आणि शरद पवार गटाची साथ आहे. त्यामुळे वैशाली दरेकर यांचं पारडं मजबूत दिसत आहे. तर, गणपत गायकवाड यांच्या नाराजीचा फटका शिंदे गटाला बसण्याची शक्यता आहे.

मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांचे सुपूत्र श्रीकांत शिंदे या मतदारसंघात खासदार असतानाही त्यांना
या जागेवरून पुन्हा उमेदवारी मिळणार की नाही याबाबत साशंकता आहे.
तर ठाकरे गटाने वैशाली दरेकर यांना उमेदवारी दिली आहे.

कोण आहेत वैशाली दरेकर
२००९मध्ये वैशाली दरेकर यांनी मनसेतून कल्याण- डोंबिवली लोकसभेची निवडणूक लढवली होती.
यावेळी शिवसेनेचे आनंद परांजपे यांना २ लाख १४ हजार ४७६ मते मिळाली. म्हणजे ३९ टक्के मते मिळाली होती.
तर राष्ट्रवादीचे उमेदवार वसंत डावखरे यांना १ लाख ८८ हजार २६७ मते मिळाली होती.
म्हणजे डावखरे यांना ३५ टक्के मते मिळाली होती.
तर मनसेच्या उमेदवार असलेल्या वैशाली दरेकर यांना १ लाख २ हजार ६३ मते मिळाली होती.

या निवडणुकीत दरेकर यांचा पराभव झाला. पण पहिल्याच निवडणुकीत लाखभर मते घेतल्याने त्या चर्चेत आल्या.
मनसेचीही ही पहिलीच निवडणूक होती. त्यानंतर २०१६ मध्ये वैशाली दरेकर यांनी पुन्हा शिवसेनेत पक्ष प्रवेश केला होता.

Join our WhatsApp GroupTelegramfacebook page and Twitter for every update

हे देखील वाचा

Pune Wagholi Crime | वाघोली येथील बिवरी गावात दरोडा, चाकूचा धाक दाखवून दरोडेखोरांनी लुटला 16 लाखांचा ऐवज

Pune Water Crisis-Traffic Issue | आम्हाला प्यायला पाणी आणि कोंडीमुक्त रस्ते कसे देणार? लोकसंख्येच्या विस्फोटामुळे पुण्याच्या पाण्याचा आणि वाहतुकीचा प्रश्न अतिगंभीरतेच्या दिशेने

Pimpri Murder Case | पिंपरी : मित्राचा खून करुन फरार झालेल्या आरोपीला मध्य प्रदेशातून अटक