अखेर ‘टक-टक’ गँग गजाआड ; कल्याण पोलिसांची मोठी आणि महत्वाची कारवाई

कल्याण : पोलीसनामा ऑनलाइन – राज्यात धुमाकूळ घालणाऱ्या ‘टक-टक’ गँगच्या कल्याण पोलिसांनी मुसक्या आवळल्या आहेत. या गँगवर राज्यात ५० हून अधिक गुन्हे दाखल आहेत. तसेच राज्याबाहेर देखील या टोळीवर गुन्हे दाखल आहे. अनेक दिवसांपासून या टोळीच्या मागावर पोलीस होते. मात्र ही टोळी कोणाच्याच हाती लागत नव्हती. अखेर कल्याण पोलिसांनी सोमवारी नऊ जणांच्या टोळीला अटक केली.

कल्याण पोलिसांनी एका दुचाकीस्वाराला पकडले होते. त्याच्याकडे केलेल्या चौकशीत टक-टक गँग पंजाब नॅशनल बँकेवर दरोडा टाकण्यासाठी येणार असल्याची माहिती मिळाली. त्यानुसार पोलिसांनी बँकेच्या परिसरात सापळा रचून टोळीतील नऊ जणांना बेड्या ठोकल्या. अटक केलेल्या आरोपींकडून अनेक गुन्हे उघडकीस येण्याची शक्यात पोलिसांनी वर्तवली आहे.

अशी करत होते चोरी

पोलिसांची डोकेदुखी ठरलेली टक-टक गँग बँकेच्या परिसरात रेकी करत होते. एखाद्या व्यक्ती पैसे काढून जात असले. तर त्याचे लक्ष विचलित करुन पैशांची बॅग पळवून नेत होते. पैशांची बॅग लुटण्यासाठी काही वेळा ते अंगावर घाण पडल्याचे सांगत होते. तर कधी पैसे पडल्याचे सांगून बॅग लंपास करत होते. कधी कधी ही टोळी अंगावर खुजली पावडर टाकून पैसे लंपास करत होती. तसेच कारचालकाच्या काचेवर टक-टक करून ही टोळी कारचालकांनाही लुटत होती. पोलिसांनी या टोळीकडून कारची काच फोडण्यासाठी वापरण्यात येणारे मिरची पावडर, सुरे, चॉपर आणि खुजली पावडर जप्त केली.

महाराष्ट्रात ५० हून अधिक गुन्हे

ही टोळी मुळची आंध्र प्रदेशातील नेल्लोर जिल्ह्यातील आहे. या टोळी विरुद्ध ठाणे पोलीस आयुक्तालयात २० गुन्हे दाखल आहेत. तर महाराष्ट्रात ५० पेक्षा जास्त गुन्हे दाखल आहेत. एखाद्या परिसरात महिनाभर बांधकाम मजूर काम करत असल्याचे भासवून परिसराची ते रेकी करत होते. रेकी केल्यानंतर गुन्हा करत होते. या गँगला पकडण्यात आजवर कोणालाही यश आले नाही. मात्र, कल्याण पोलिसांनी त्यांच्या मुसक्या आवळून मोठी करावाई केली.

सिने जगत –

‘माता-पिता की चरणों में स्वर्ग’ म्हणणाऱ्या ‘या’ अभिनेत्रीचा ‘वाढीव’ लुक पाहिलात का ?

…म्हणून सानिया मिर्झा, वीना मलिक यांच्यात ट्विटरवर ‘जुंपली’, पुढे झालं ‘असं’

‘कलंक’मुळे माझ्या करिअरला ‘कलंक’ : वरूण धवन

अभिनेत्री उशोशी सेनगुप्‍ता म्हणाली, गप्प बसली असते तर झाली नसती ‘छेडछाड’ ; ७ गुंडाना अटक

पोलीसनामा न्युज आता टेलीग्रामवर... आमचं चॅनेल (@policenamanews) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.
WhatsAPP
You might also like