मुंबई : ‘सीक्रेट गेम’च्या नावाखाली ‘ते’ करत होते ७ वर्षाच्या मुलीवर सामुहिक बलात्कार

मुंबई : पोलीसनामा ऑनलाइन – आईवडिल नोकरीनिमित्त बाहेर व्यस्त असल्याने ७ वर्षाच्या मुलीला ते एका आजीकडे शाळा सुटल्यानंतर ठेवत. तेथे पाच वर्षाच्या चुलत भावाबरोबर ती तसले कृत्य करीत असताना आजीने पाहिले. तेव्हा या मुलीने हे सीक्रेट गेम आहे, दुकानदार काका माझ्याबरोबर नेहमीच खेळतात. त्यातून ७ वर्षाच्या मुलीवर दुकानदार करीत असलेल्या बलात्काराचा प्रकार उघडकीस आला.
कल्याण मधील तीन दुकानदाराचा हा सामुहिक बलात्काराचा प्रकार गेल्या एक वर्षापासून सुरु होता. याप्रकरणी बाजार पेठ पोलिसांनी तिघा दुकानदारांना अटक केली आहे. त्यातील एकाचे गारमेंटचे, दुसऱ्याचे बॅग आणि तिसऱ्याचे केटरिंगचे दुकान आहे.

सात वर्षाची ही मुलगी शाळा सुटल्यावर रिक्षासाठी दररोज दुपारी १२ ते १२ वाजून २० मिनिटे तेथील दुकानासमोर वाट पहात थांबत असे. त्यानंतर रिक्षातून घरी जात असे. हे या तिघांनी हेरले. तिच्याशी बोलून त्यांनी तिच्याशी मैत्री केली. ती दररोज तेथे थांबत असल्याने त्यांनी एके दिवशी तिला बाजूला एकांतात घेऊन गेले व तुला सीक्रेट गेम खेळायची का असे सांगून तिच्यावर बलात्कार केला. त्यानंतर तिला पुन्हा रिक्षा येण्याच्या आत तिच्या जागेवर आणून सोडले. हा प्रकार अनेक वेळा झाला. पण तिने कोणाकडे तक्रार केली नाही.

'सीक्रेट गेम' सिखाने के नाम पर सात साल की बच्ची से किया जाता रहा गैंग रेप

आई वडिल नोकरी करीत असल्याने शाळा सुटल्यावर ती दुपारच्या वेळी आजीकडे थांबत होती. तेथे हे दुकानदार जसे करत होते, तसे तिने एके दिवशी आपल्या पाच वर्षाच्या चुलत भावाबरोबर करायला सुरुवात केली. हा प्रकार घरातील आजींने पाहिला. तिला रागावली. तेव्हा तिने सांगितले की हा सीक्रेट गेम आहे. मला दुकानदार काकांनी शिकविला. हे ऐकून त्यांना धक्काच बसला.

त्यांनी मुलीच्या आई वडिलांना हा प्रकार सांगितला. दोघे ही गपचुप मुलीच्या शाळा सुटण्याच्या वेळी तिच्या मागोमाग गेले व त्यांनी ते कोण दुकानदार आहेत, याची माहिती घेऊन पोलिसांकडे तक्रार केली. पोलिसांनी या तिघाही दुकानदारांना पाॅस्को कायद्याखाली अटक केली आहे.

Visit : policenama.com