भोंदू बाबाकडून अनेक भक्‍तांचं लैंगिक शोषण ; टिटवाळा पोलिस ठाण्यात गुन्हा दाखल

कल्याण जवळील टिटवाळयातील घटना

कल्याण : पोलीसनामा ऑनलाइन – टिटवाळयात एका भोंदू बाबाचा पर्दाफाश झाला आहे. भूत उतरविण्याच्या नावाखाली भोंदू बाबा रासलिला करीत होता. भक्‍तांचं लैंगिक शोषण केल्याचा खळबळजनक प्रकार उघडकीस आल्यानंतर बाबाविरोधात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. दरम्यान, भोंदूगिरीचा पर्दाफाश झाल्यानंतर भोंदू बाबाने पसार झाला आहे.

ललजीत सिंग उर्फ मंजू माताजी असे गुन्हा दाखल झालेल्या भोंदू बाबाचे नाव आहे. तो स्वतःला वैष्णोदेवीचा खुप मोठा भक्‍त असल्याचे इतरांना सांगत होता. टिटवाळयाच्या मांडा परिसरात त्यानं मोठं मंदिर देखील उभारलं होतं. मंदिरात दर्शनासाठी येणार्‍या भाविकांना तो हातचलाखीने हवेतून चांदीचे शिक्के, काजू-बदाम काढून तो प्रसाद म्हणून भाविकांना देत होता. उल्हासनगरच्या एका भक्‍ताने बाबाच्या आश्रमात सेवा सुरू केली.

भक्‍ताच्या पत्नीची प्रकृती ठीक नसल्याचे लक्षात आल्यानंतर तिच्यावर कोणीतरी करणी केली असल्याचे बाबाने त्याला सांगितले. करणी उतरविण्यासाठी बाबाने भक्‍ताला त्याच्याशी अनेकदा अनैसर्गिक लैंगिक संबंध ठेवण्यास भाग देखील पाडले. त्यानंतर देखील भक्‍ताच्या पत्नीच्या प्रकृतीमध्ये सुधारणा झाली नाही.

त्यामुळे भक्‍ताने बाबांच्या हालचालींवर लक्ष ठेवण्यास सुरवात केली असता बाबा अनेकांचे लैंगिक शोषण करीत असल्याचा धक्‍कादायक प्रकार समोर आला. पिडीत भक्‍ताने तात्काळ अंधश्रध्दा निर्मूलन समितीकडे धाव घेतली. बाबाविरूध्द टिटवाळा पोलस ठाण्यात तक्रार करण्यात आली. प्राप्‍त तक्रारीनंतर पोलिसांनी भोंदू बाबा मंजू माता याच्याविरूध्द जादूटोणाविरोधी कायद्यानुसार गुन्हा दाखल केला. गुन्हा दाखल झाल्याची कुणकुण लागताच भोंदू बाबा पसार झाला. टिटवाळा पोलिस त्याचा शोध घेत आहेत.

पोलीसनामा न्युज आता टेलीग्रामवर... आमचं चॅनेल (@policenamanews) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.
Cinque Terre
You might also like