Kalyani Nagar Car Accident Pune | ब्लड सॅम्पल बदलले का ? शिवानी अगरवालकडून उडवाउडवीची उत्तरे

पुणे : पोलीसनामा ऑनलाईन – Kalyani Nagar Car Accident Pune | कल्याणीनगर अपघात प्रकरणात आरोपी असलेल्या मुलाचे रक्ताचे नमुने बदलण्यात आले होते. याच आरोपाखाली संबंधित प्रकरणातील आरोपी असलेल्या अल्पवयीन मुलाची आई शिवानी अगरवाल (Shivani Vishal Agarwal) यांना अटक करण्यात आली आहे.

विशाल अगरवालला याआधीच अटक करण्यात आली आहे. विशाल अगरवालला (Vishal Agarwal) तुरुंगातून (Yerawada Jail) गुन्हे शाखेने ताब्यात (Pune Crime Branch) घेतले आहे. उद्या म्हणजेच २ जूनला आई-वडिलांना सोबतच न्यायालयात हजर केले जाणार आहे.(Kalyani Nagar Car Accident Pune)

अटक केल्यानंतर शिवानी अगरवाल यांची चौकशी करण्यात आली. या चौकशीत संबंधित मुलाच्या आईकडून
उडवाउडवीची उत्तरे देण्यात आल्याची माहिती समोर आली आहे.

रक्त नमुने बदलणे (Blood Sample Tampering Case), पुरावे नष्ट करणे, कट रचणे आणि इतर घटनाक्रमामध्ये
शिवानी अगरवाल यांचा सहभाग तपासण्यात येत आहे.

सबळ पुरावे हाती लागल्यावरच कारवाई सुरु करणार असल्याचे सांगण्यात येत आहे.
याआधी देखील अल्पवयीन मुलाचे आजोबा आणि वडील विशाल अगरवाल हे चौकशीत सहकार्य करत नसल्याचे पोलिसांनी सांगितले होते.

Join our WhatsApp GroupTelegramfacebook page and Twitter for every update

हे देखील वाचा

Porsche Sports Cars In Pune | पुण्याच्या रस्त्यावर धावताता तब्बल 25 पोर्शे स्पोर्ट्स कार

Pune Pimpri Chinchwad Crime News | पिंपरी : दारुच्या क्वाटरचे पैसे न दिल्याने दोन भावांना मारहाण, 5 जणांना अटक

Action On Pubs & Bars In Pune | पुण्यातील अनधिकृत पब, बार वरील कारवाईचा हातोडा अचानक थंडावला: कारवाईची संख्या 40 वरून फक्त 2 वर