ADV

Kalyani Nagar Car Accident Pune | पुणे हिट अँड रन प्रकरण : पोर्शे कार अपघातातील अल्पवयीन मुलाचा बाल सुधारगृहातील मुक्काम वाढला, 18 जून पर्यंत कामकाज स्थगित

पुणे : पोलीसनामा ऑनलाइन – Kalyani Nagar Car Accident Pune | कल्याणी नगर पोर्शे कार अपघात प्रकरणातील (Porsche Car Accident Pune) अल्पवयीन मुलाच्या अडचणीत वाढ झाली आहे. आरोपी मुलाचा बाल सुधारगृहातील मुक्काम वाढला आहे. बुधवारी (दि.12) आरोपी मुलाला बाल न्याय मंडळात (Juvenile Justice Board-JJB) हजर करण्यात आले होते. या प्रकरणाच्या सुनावणीदरम्यान बाल न्याय मंडळाने आरोपी मुलाचा निर्णय 18 जूनला घेण्यात येईल असे सांगत कामकाज स्थगित केले. त्यामुळे अल्पवयीन मुलाला 18 जून पर्यंत बाल सुधारगृहातच राहावे लागणार आहे.(Kalyani Nagar Car Accident Pune)

कल्याणी नगर अपघात प्रकरणातील अल्पवयीन आरोपीला 12 जूनपर्यंत बाल सुधारगृहात पाठविण्याचा आदेश मंडळाने दिला होता. ही मुदत आज संपत असल्याने पोलिसांनी मुलाला आणखी 14 दिवस बालसुधारगृहात ठेवण्यात यावे, असा अर्ज पुणे पोलिसांकडून बाल न्याय मंडळात दाखल करण्यात आला. गुन्ह्याचा तपास करणारे तपास अधिकारी सहायक पोलीस आयुक्त सुनील तांबे (ACP Sunil Tambe) यांनी हा अर्ज केला.

मिळालेल्या माहितीनुसार, बाल न्याय मंडळाचे नियमित मुख्य न्यायाधीश आज (बुधवार) सुनावणीदरम्यान उपस्थित नव्हते. त्यांच्या जागी दुसऱ्या न्यायाधीशांनी सुनावणी घेतली. त्यामुळे मी नियमित न्यायाधीश नसल्यामुळे अल्पवयीन आरोपी बाबतचा निर्णय 18 जूनला घेण्यात येईल, असं म्हणत न्यायालयाने कामकाज स्थगित केले. त्यामुळे आरोपी अल्पवयीन मुलाचा मुक्काम 18 जूनपर्यंत वाढला आहे.

सुनावणी दरम्यान पोलिसांनी अल्पवयीन आरोपीला आणखी 14 दिवस बाल सुधारगृहात ठेवण्याची मागणी केली होती. तर बचाव पक्षाने मुलाला घरी सोडण्याची विनंती बाल न्याय मंडळाकडे केली. यावेळी पोलिसांनी अशी मागणी केली की, तपास सुरु आहे. मुलाला घरी सोडल्यास इतर नातेवाईकांच्या मदतीने तपासावर परिणाम करेल. बाल सुधारगृहात मुलाचे समुपदेशन सुरु आहे. ते पूर्ण व्हायचे आहे. त्यासाठी त्याला इथेच ठेवावे. मुलाच्या घरी त्याची काळजी घेण्यासाठी कोणी नाही. त्यामुळे त्याच्या मनावर परिणाम होऊ शकतो. त्याच्या जीवाला बाहेर धोका होऊ शकतो. त्यामुळे त्याला सुधारगृहातच ठेवण्यात यावे.

Join our WhatsApp GroupTelegramfacebook page and Twitter for every update

हे देखील वाचा

MNS-BJP-Mahayuti | महायुतीत चौथा वाटेकरी, मनसेने महायुतीकडे ‘या’ 20 जागा मागितल्या? ; जाणून घ्या

RSS On BJP About Support Of Ajit Pawar | पुरेसे बहुमत असताना अजितदादांना सोबत का घेतलं? RSS ने भाजपाला सुनावलं

Sassoon Hospital | ससूनच्या डॉक्टरांची खाजगी मेडिकलवाल्यांशी ‘दुकानदारी’; ससून रुग्णालयाचा कारभार पुन्हा चव्हाट्यावर, कारवाई होणार? (Video)

Maha Vikas Aghadi | अखेर मविआचा तिढा सुटला; विधानपरिषद निवडणुकीतील दोन उमेदवारांचा अर्ज मागे