पुणे : Kalyani Nagar Pune Crime News | मध्यरात्रीपर्यंत धुडगुस सुरु असलेला भाग म्हणून कल्याणीनगर हा शहरात कुप्रसिद्ध झाला आहे. पोर्शे कार अपघात, पब यामुळे चर्चेत असलेल्या कल्याणीनगरमधील हॉटेलमध्ये पुन्हा एकदा मध्यरात्रीपर्यंत मोठमोठ्या आवाजा साऊंड सिस्टिम सुरु असल्याचे समोर आले आहे. उशिरापर्यंत साऊंड सिस्टिम सुरु ठेवल्याप्रकरणी येरवडा पोलिसांनी दोन हॉटेल मालकांविरुद्ध गुन्हा दाखल केला आहे.
कल्याणीनगर येथील कुकू हॉटेलचे मालक खुशबु वर्मा, व्यवस्थापक फैयाज फकिराउद्दीन मीर (वय ३२) तसेच ओ आय ब्रु हाऊस हॉटेलचे मालक अमन प्रेम तलरेजा (वय ३०, रा. कोरेगाव पार्क), मॅनेजर निखील सुनिल बेडेकर (वय ३६, रा. के सी सोसायटी, मुंढवा) अशी गुन्हा दाखल झालेल्यांची नावे आहेत.
याबाबत पोलीस हवालदार प्रवीण खाटमोडे यांनी येरवडा पोलीस ठाण्यात फिर्याद दिली आहे.
कल्याणीनगर येथील हॉटेल कुकू येथे शुक्रवारी मध्यरात्री पोलिसांनी छापा टाकला असता मध्यरात्रीनंतरही हॉटेलमध्ये बेकायदेशीरपणे साऊंड सिस्टिम सुरु होती. यावेळी हॉटेलमध्ये ४८ ग्राहक होते.
दुसर्या कारवाईमध्ये पोलीस हवालदार रामेश्वर दशरथ नवले यांनी फिर्याद दिली आहे.
प्रशासनाने घालून दिलेल्या नियमांप्रमाणे साऊंड सिस्टीम वाजविण्याची परवानगी घेणे आवश्यक असताना
त्याचे उल्लंघन करुन हॉटेलमध्ये २५ ते ३० ग्राहकांच्या उपस्थितीत विना परवाना साऊंड सिस्टिम सुरु ठेवून
त्यांचा लाभ ग्राहकांना लाभ देताना मिळून आले. सहायक पोलीस निरीक्षक महेश लामखडे तपास करीत आहेत.
कल्याणीनगर, येरवडा परिसरात पबची संख्या वाढली असून रात्री उशिरापर्यंत येथे मोठमोठ्या आवाज साऊंड
सिस्टिम लावली जाऊन परिसरात राहणार्या नागरिकांना त्रास दिला जात असल्याचे यापूर्वी अनेकदा समोर आले आहे.
पोलिसांनी या हॉटेलवर अनेक खटले दाखल केले असले तरी नियमांचे उल्लंघन करुन
साऊंट सिस्टीम सुरुच असल्याचे दिसून आले आहे. (Kalyani Nagar Pune Crime News)
इन्स्टाग्राम पेजला फॉलो करण्यासाठी खालील लिंकवर क्लीक करा
https://www.instagram.com/policenamaa/?hl=en#
Ozar Pune Accident News | पुणे : मोटारसायकल आणि कारच्या धडकेत एकाचा दुर्दैवी मृत्यू;
अपघातानंतर कार चालकाने पळ काढला
Daund Leopard Attack | पुणे / दौंड: बिबट्याच्या हल्ल्यात महिलेचा मृत्यू; परिसरात भीतीचे वातावरण