‘आमिर खान, सलमान खानपासून संजय दत्तपर्यंत सर्वच प्रेक्षकांना बुद्धू बनवतात’ : ‘या’ आभिनेत्याचे वक्तव्य

मुंबई : पोलीसनामा ऑनलाईन – चित्रपट अभिनेता कमाल आर खान याने सोशल मिडियावर जावेद जाफरीचा मुलगा मीझेन जाफरी व दिग्दर्शक संजय लिला भन्साळी यांची पुतणी शर्मिन सेगल यांना ट्रोल करुन म्हणाले की, ‘डफर अ‍ॅक्टर्स’. यामुळे जावेद जाफरी आणि कमाल आर खान यांच्यामध्ये चांगलीच लढाई सुरु झाली आहे. जावेद यांचा मुलगा मीझेन आणि भन्साळी यांची पुतणी शर्मिन हे दोघे ‘मलाल’ चित्रपटातून पदार्पण करत आहे.

कमाल आर खानने सोशल मिडियावर मीझेन आणि शर्मिन यांना ट्रोल करताना लिहले की, ‘चित्रपटाचा निर्माता अशा कलाकारांना लॉंन्च करत आहे. जे की दिसायला चांगले नाहीत आणि त्याचबरोबर त्यांच्यामध्ये अभिनय करण्याची क्षमता देखील नाही. जर वंशवादामुळे असे होत असेल तर हा गुन्हा आहे. अशा कलाकारांचे चित्रपट पाहण्यासाठी प्रेक्षक त्यांचे पैसे खर्च करणार नाही. ‘

जावेद जाफरी यांनी कमाल यांना प्रत्युत्तर देत लिहले की, ‘अयशस्वी कलाकारांचा आवाज समोर आला आहे. आता मी वंशवादाच्या लाभार्थियांची यादी देत आहे. अभिनेता आमिर खान, सलमान खान, अजय देवगण, संजय दत्त ऋुषी कपूर, अभिनेत्री करिना कपूर असे नाव आहेत. ज्यांनी अनेक वर्षे लोकांना बुद्धू बनविले आहे.’

एका ट्विटमध्ये जाफरी यांनी लिहले की, ‘प्रतिस्पर्धात्मक आणि उतार-चढावने भरलेल्या बाजारामध्ये कोणीही अप्रतिभाशाली आणि बुद्धू कलाकारांवर पैसे लावत नाही. सुरुवातीला भले ही लोकांच्या ओळखीवर चित्रपटात काम मिळेल पण वेळेची कसोटी आणि प्रेक्षकांच्या अपेक्षांना खरे उतरने खुप मोठे आव्हान आहे. ‘

पोलीसनामा न्युज आता टेलीग्रामवर... आमचं चॅनेल (@policenamanews) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.
WhatsAPP
You might also like