करण माझ्यावर हसला होता म्हणून आज रडतोय, ‘या’ अभिनेत्याचा खुलासा

पोलिसनामा ऑनलाईन टीम – दिग्दर्शक करण जोहरवर निशाणा साधला आहे. करणने त्यावेळी मला कमी लेखले होते, त्यामुळे आज त्याच्यावर रडण्याची पाळी आली आहे. असं म्हणत अभिनेता कमाल आर. खानने टीका केली आहे. कमाल वादग्रस्त वक्तव्यांमुळे नेहमीच चर्चेत असतो. नेहमीच विविध क्षेत्रातील सेलिब्रिटींवर टीका करत असतो.

‘कॉफी विथ करण’ या शोमध्ये करण जोहरने कमाल खानची खिल्ली उडवली होती. तो जुना व्हिडीओ पोस्ट करुन कमालने राग व्यक्त केला आहे. त्यावेळी करण माझ्यावर हसला होता. माझी खिल्ली उडवली. त्याने मला कमी लेखले होते. त्यामुळे त्याच्यावर आज रडण्याची पाळी आली आहे. अशा आशयाचे ट्विट केआरकेने केले आहे. सुशांतच्या आत्महत्येमुळे सध्या करण जोहरवर जोरदार टीका केली जात आहे.

सुशांतच्या मृत्यूसाठी करणला जबाबदार धरले जात आहे. परिणामी त्याच्या चित्रपटांवर आता बंदी घालण्याची मागणी होत आहे. त्याचे सोशल मीडिया फॉलोअर्स देखील कमी झाले आहेत. या पार्श्वभूमीवर करण नैराश्येमध्ये गेल्याचे म्हटले जात आहे. हे निमित्त साधून कमाल खानने करणवर निशाणा साधला आहे. त्याच्यावरील राग व्यक्त केला आहे.