Manikarnika Returns : चोरीच्या आरोपांनंतर कंगनाच्या सिनेमाचे प्रोड्युसर कमल जैन यांनी दिलं स्पष्टीकरण ! म्हणाले…

मुंबई : पोलीसनामा ऑनलाइन – बॉलिवूड ॲक्ट्रेस कंगना रणौत (Kangana Ranaut) हिनं नुकतीच मणिकर्णिका फ्रेंचायजी पुढं नेण्याची घोषणा केली. लवकरच ती मणिकर्णिका रिटर्न्स : द लिजेंड ऑफ दिद्दा (Manikarnika Returns: The Legend Of Didda) मध्ये दिसणार आहे. मणिकर्णिका सिनेमात झाशीच्या राणीची कहाणी दाखवण्यात आली होती. तर या सिनेमात मात्र काश्मीरच्या राणी बद्दल सांगितलं जाणार आहे. परंतु सिनेमाची घोषणा करताच ॲक्ट्रेसवर चोरीचा आरोप लावण्यात आला होता. दिद्दा पुस्तकाचे रायटर आशिष कौल (Aashish Kaul) यांनी आरोप केला होता की, कंगनानं त्यांची स्टोरी चोरली आहे. यावर आता सिनेमाचे प्रोड्युसर कमल जैन (Kamal Jain) यांनी प्रतिक्रिया दिली आहे. त्यांनी या आरोपांचं खंडन केलं आहे. एका वृत्तपत्राशी बोलताना त्यांनी सांगितलं की, मी आशिष कौलला ओळखत नाही. मी त्यांचं पुस्तकही वाचलेलं नाही.

अशा स्टोरीजवर कॉपीराईट्सची गरज नाही
कमल जैन म्हणाले, ज्या महान वीर आण वीरांगणा यांच्या स्टोरीज या 1950 च्या आधीच्या आहेत त्यांच्यावर कॉपीराईट्सची गरज नसते. झाशीच्या राणीवर आम्ही स्टोरी बनवली होती त्यावरही आम्हाला कुठून कॉपीराईट्स घेण्याची गरज नाही पडली. धोनीच्या बायोपिकसाठी आम्ही राईट्स घेतले. कारण ती आजच्या काळातील स्टोरी आहे.

दोन राईट्सला सोपवली स्टोरी लिहिण्याची जबाबदारी
जैन यांच्यानुसार, दिद्दावर आम्ही एक महिन्यापूर्वीच दोन मोठ्या रायटर्सला एक लार्जर दॅन लाईफ स्टोरी लिहायला सांगितली आहे. त्यांची नावंही आम्ही लवकरच घोषित करू. अव्हेंजर्स सीरिजमध्ये ब्लॅक पॅंथरची स्टोरी सर्वात स्ट्राँग आहे. त्यात इंडियन मायथॉलॉजीचीही झलक आहे. आम्ही दिद्दाला ब्लॅक पंथरच्या स्केलपेक्षाही उंच घेऊन जाऊ. बजेट 80 कोटींच्या वर जाऊ शकतं.

काय आहे आशिष कौलचा आरोप ?
एका मुलाखतीत बोलताना आशिष यांनी सांगितलं की, आपल्या अधिकारांसाठी लढणारी कंगना माझ्या सारख्या एका रायटरच्या अधिकारांचा खुलेआम हनन करत नाहीये का. कंगनानं अधिकारांचं उल्लंघन केलं आहे. हे बेकायदेशीर आहे. देशाच्या आयपीआर आणि कॉपीराईट कायद्यांचं पूर्णपणे उल्लंघन आहे.

त्यांनी सांगितलं की, काश्मीरची वीरांगणा दिद्दावर त्यांनी पुस्तक लिहिलं आहे. याचं प्रकाशन त्यांनी बिग बी अमिताभ बच्चन यांच्या हस्ते केलं होतं. त्यांचा दावा आहे की, या विषयावर त्यांच्या व्यतिरीक्त कोणीही पुस्तक लिहिलेलं नाही. अशात कोणी त्यावर सिनेमा कसं बनवू शकतं.

पुढं ते म्हणाले की, कंगनाचा हा अंदाज काही समजला नाही. मी याला एक इंटेलेक्चुअल चोरी म्हणेल असंही त्यांनी सांगितलं.