मध्य प्रदेशातील काँग्रेसचं सरकार 15 महिन्यातच ‘अनाथ’, कलमनाथ यांचा मुख्यमंत्री पदाचा ‘राजीनामा’

पोलिसनामा ऑनलाईन टीम – मध्य प्रदेशात काँग्रेसला सर्वात मोठा धक्का बसला आहे. ज्योतिरादित्य शिंदे यांच्या राजीनाम्यानंतर मध्य प्रदेशात अनेक राजकीय घडामोडी घडल्या होत्या. त्याचा शेवट अखेर आज झाला असून प्लोअर टेस्टआधीच मध्ये प्रदेशातील मुख्यमंत्री कमलनाथ यांनीं राजीनामा दिला आहे. कमलनाथ यांनी पत्रकार परिषद घेऊन भाजपावर आरोप करत राजीनामा देत असल्याची यांची माहिती दिली.

काँगेसच्या कारभारावर नाराज होउन ज्योतिरादित्य शिंदे यांनी राजीनामा दिला होता. त्यानंतर शिंदे यांच्या 20 समर्थक आमदारांनी राजीनामा देउन भाजपशी घरोबा केला. त्यामुळे मध्य प्रदेशात काँग्रेसचे सरकार अल्पमतात आले होते. सर्वोच्च न्यायालयाच्या आदेशानुसार आज कमलनाथ सरकारने बहुमत सिद्ध करावयाचे होते. मात्र, अपेक्षित संख्याबळ नसल्यामुळे त्यांनी पत्रकार परिषद घेउन मुख्यमंत्री पदाचा राजीनामा दिला. त्यामुळे मागील काही दिवसांपासून मध्यपृदेशात सुरु असलेला सत्ता संघर्ष संपुष्टात आला आहे.