सलमान ‘त्या’ 2 अभिनेत्यांचं करिअर बरबाद करतोय ?

मुंबई : पोलीसनामा ऑनलाईन – स्वयंघोषित फिल्म क्रिटीक आणि अ‍ॅक्टर कमाल राशिद खाननं (केआरके) बॉलिवूड स्टार सलमान खानवर आरोप करत म्हटलं आहे की, तो बिग बॉसच्या 13 व्या सीजनचे स्पर्धक अरहान खान आणि पारस छाबडा यांचं करिअर बरबाद करत आहे. शोमध्ये सलमान खानचा पक्षपातीपणा दिसत आहे. त्याला कोणाचाही अपमान करण्याचा अधिकार नाही असंही त्यानं म्हटलं आहे. नेहमीच आपल्या वक्तव्यानं वाद निर्माण करणाऱ्या कमाल आर खान म्हणजेच केआरकेनं पुन्हा एकदा नव्या वादाला तोंड फोडलं आहे.

सोशल मीडियावर ट्विट करत केआरके म्हणतो, “हे तर स्पष्ट आहे की, बिग बॉसमध्ये सलमान खान पक्षपाती आहे. तो अरहान आणि पारससारख्या लहान कलाकारांचं करिअर बरबाद करत आहे. तसं तर मलाही ते आवडत नाहीत. परंतु अशा प्रकारे नवीन कलाकारांचा अपमान करण्याचा त्याला कोणताही अधिकार नाही. त्यासाठी त्याचा (सलमान खानचा) राधे हा सिनेमा बॉयकॉट करूयात.” असं आवाहन त्यानं केलं आहे.

सलमान खाननं अरहान खानची पोलखोल करत रश्मी देसाईसहित सर्वांनाच सांगितलं होतं की, तो विवाहित आहे. त्याला मुलंही आहेत. हे कळल्यानंतर सगळेच चकित झाले होते. यावेळी सलमाननं पारस छाबडाचा समाचार घेत माहिराला सांगितलं होतं की, पारसनं त्याची गर्लफ्रेंड आकांक्षा पुरीला लग्नाच वचन दिलं आहे.

फेसबुक पेज लाईक करा – 

You might also like