अमेरिकेच्या राष्ट्रपती पदाच्या निवडणुकीवरून ‘घमासान’ ! LIVE TV वर ‘तुलसी’ आणि ‘कमळा’मध्ये जुंपली (व्हिडिओ)

नवी दिल्ली : वृत्तसंस्था – पुढील वर्षी अमेरिकेत होणाऱ्या राष्ट्रपती पदाच्या निवडणुकांवर आत्ताच वातावरण तापायला सुरुवात झाली आहे. डेमोक्रेट्स पार्टीच्या पाचव्या डिबेटमध्ये दोन भारतीय वंशाच्या महिलांमध्ये शाब्दिक चकमक पहायला मिळाली. सेनेटर कमला हैरिस आणि कांग्रेस वुमेन तुलसी गबार्ड यांच्यात चांगलीच वादावादी झाली. ज्याचा व्हिडीओ मोठ्या प्रमाणात व्हायरल होत आहे.

सुरुवातीलाच तुलसी गबार्ड यांनी आपले मत मांडायला सुरुवात केली त्यावेळी त्या म्हणाल्या जर त्या राष्ट्रपती झाल्या तर प्रत्येक वेळेस मध्य पूर्व भागात अमेरिकन सैनिकांना जावे लागणार नाही. जर आवश्यकता वाटलीच तर पाठवले जाईल. यावेळी त्यांनी सध्याच्या सरकारच्या धोरणांनवर चांगलीच टीका केली. यानंतर तुलसी यांच्या प्रश्नांना सेनेटर कमला हैरिस यांनी उत्तर देताना संपूर्ण इतिहास सांगितला.

कमला यांनी सांगितले की, आमच्यासोबत मंचावर त्या आहेत ज्यांनी ओबामा सरकारवर नेहमीच टीका केली होती. एवढेच नाही तर डोनाल्ड ट्रम्प ज्यावेळी जिंकले त्यावेळी देखील सर्वात आधी तुलसी यांनीच अभिनंदन केले होते.

तुलसी गबार्डने दिले प्रतीउत्तर
ज्यावेळी तुलसी यांच्यावर आरोप केले जात होते त्यावेळी वारंवार तुलसी या हे सगळं खोट असल्याचे सांगत होत्या मात्र कमला यांनी यावेळी स्पष्ट केले की आता अशा व्यक्तीने पुढे जाणे गरजेचे आहे जो की डोनाल्ड ट्रम्प यांच्या योजनांचा समाचार घेऊ शकेल. तुलसी यांनी यावेळी उत्तर देताना सांगितले की, एक व्यक्ती वारंवार खोटं बोलत आहे आणि त्या या गोष्टीला मानण्यास नकार देत आहेत की, परराष्ट्रीय धोरणाबाबतचे माझे सर्व निर्णय चांगले होते.

अमेरिकेत राष्ट्रपती पदाच्या निवडणुकीला सुरुवात झालेली आहे. सध्या पक्षांमधील डिबेटला सुरुवात झालेली आहे. पहिल्यांदा पक्षा पक्षांत डिबेट होणार आणि शेवटी दोनीही पक्षांच्या उमेदवारांमध्ये लढत होईल.

Visit : Policenama.com